पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी
धुळ्यात ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न
धुळे जिल्हा
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापनादिनानिमित्त धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करीत राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली.
धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर होण्यासाठी सदैव तत्पर राहीन, अशी ठाम ग्वाही देत धुळे जिल्ह्यावासीयांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.
यावेळी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सीमा अहिरे, संजय बागडे, महादेव खेडकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, अपर तहसिलदार वैशाली हिंगे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते धुळे पोलिस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण तसेच धुळे महानगरपालिकेच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातर्ंगत पोलीस मुख्यालय, धुळे येथे बांधण्यात येणार्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे भूमिपूजन, पोलीस दल व एबी फाऊंडेशनच्यावतीने पोलीस कुटूंबियांसाठी राबविलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन, तसेच धुळे येथे शासकीय गुलमोहर विश्रामगृह परिसरात अतिमहत्वाचे व्यक्तींकरीता नवीन व्ही.आय.पी. विश्रामगृहाचे भूमीपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक ६, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल (पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड (पुरुष व महिला), धुळे पोलीस आणि एसआरपीएफ संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक (सॅम) मोबाईल फॉरेन्सिक इन्हेुळस्टीगेशन व्हॅन, पोलीस विभागाचे चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक, अग्निशामक दल आदी संचलनात सहभागी झाले. संचलनाचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सागर देशमुख यांनी केले. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.