पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलिस, खेळाडू, संस्थाचालकांना पुरस्कार प्रदान
धुळे जिल्हा
धुळे जिल्हा ध्वजारोहण सोहळ्यावेळी विविध पुरस्कार विजेत्यांचा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
यात आदर्श तलाठी पुरस्कार राकेश भोई, धुळे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे, सुधीर सोनवणे, पोलीस हवालदार ललीत पाटील, कांतिलाल अहिरे, विशाल मोहने, महिला पोलीस उप निरिक्षक लक्ष्मी करंकार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे सहायक पोलीस उपनिरिक्षक विशाल पाटील यांना पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन २०२३-२०२४ व सन २०२४-२०२५ या वर्षांसाठी खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा गुणवंत खेळाडु (महिला) पुरस्कार पुर्वा दिलीप निकम, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे, जिल्हा गुणवंत खेळाडू (पुरुष) पुरस्कार प्रथमेश अमरीश देवरे, जिल्हा गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार कु. अनुराधा दिलीप चौधरी, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू राहुल ईश्वर बैसाणे, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुकदेव गोरख भिल यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन २०२३-२०२४ व सन २०२४-२०२५ या वर्षांसाठी खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
तसेच सन २०२२-२०२३, २०२३-२४, २०२४-२०२५ वर्षासाठी युवक, युवती व संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला यात जिल्हा युवा पुरस्कार (युवती) ऍड. शितल जावरे, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) सागर राजेंद्र पटेल, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) कु.सुवर्णा भालचंद्र देसले, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) प्रकाश शरद पाटील, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) कु.वृदावना भीमराव पाटील तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) इंदीरा महिला मंडळ वलवाडी ता.जि.धुळे अध्यक्षा प्रभा परदेशी यांना पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.