शैक्षणिक साहित्य खरेदी: सक्तीखोर शाळांवर होणार कारवाई

शैक्षणिक साहित्य खरेदी: सक्तीखोर शाळांवर होणार कारवाई  पालकांसाठी खुश खबर….

धुळे जिल्हा

कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही शाळांना शैक्षणिक साहित्याची विक्री करता येणार नाही, तसे  केल्यास गंभीर दखल घेऊन त्या संबंधित शाळांवर  कारवाई करण्यात येईल असा ईशारा वजा आदेश शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिला.

शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशामुळे  पालकांना दरवर्षी होणारा अतिरिक्त खर्च आणि मानसिक त्रास कमी होऊ शकेल.
राज्य शासनाने ११ जून २००४  रोजी काढलेल्या  आदेशाचे पालन योग्य रीतीने किंवा पूर्णतः होत नसल्याने धुळे व मालेगाव येथील शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांची भेट घेतली व या संदर्भात विस्तृत माहिती दिली. यानंतर बंग यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ  तयार करून राज्याचे शैक्षणिक मंत्री  दादा भुसे व आ. अनुप अग्रवाल यांची भेट घेण्यात आली. दोघांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली.  पालकांवर पडणारा आर्थिक बोजा, मनस्ताप या सर्व बाबी जाणून घेण्यात आल्या. प्रामुख्याने न्यायालय आणि शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून त्याची पायमल्ली कशी होत आहे याचीही काही उदाहरणे देण्यात आली. या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाचे  शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी २८ एप्रिल रोजी आदेश काढला आहे.

या आदेशान्वये कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही शाळांना शैक्षणिक साहित्याची विक्री करता येणार नाही, तसे केल्यास गंभीर दखल घेऊन संबंधितवर कारवाई करण्यात येईल असे बजावण्यात आले आहे.हा निर्णय तातडीने घेण्यात महत्वाची भूमिका निभावल्याने संघटनेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे,आ.अनुप अग्रवाल जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले आहेत.यापुढे पालकांवर अशा कोणत्याही प्रकारची खरेदी बाबत सक्ती झाल्यास पालकांनी शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना ,धुळे यांच्याकडे त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *