पोलिसांसाठी “समर्पण” आरोग्य शिबिराचे आयोजन

पोलिसांसाठी “समर्पण” आरोग्य शिबिराचे आयोजन

जिल्हा पोलीस दल व एबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने १ मे रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन

धुळे शहर

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या आरोग्याचे ही परवा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी एक मे रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दल व एबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी करण्यात आले आहे.
आमदार अनुप भैय्या अग्रवाल,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून पोलीस बांधवांसाठी प्रथमच समर्पण आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख मान्यवर म्हणून पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप भैया अग्रवाल, जिल्हाधिकारी पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे याचा प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहे.

समाजासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस बांधव आपले समर्पण देत असतात. सुरक्षितेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस बांधवांचा समाजात मोठा वाटा आहे. पोलीस बांधवांनी व पोलीस कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराचा संपूर्णतः व्यवस्था आरोग्यदूत कमलेश देवरे यांच्या देखरेखित करण्यात येत आहे. आरोग्य च्या दृष्टिकोनातून पोलीस बांधवांची व कुटुंब यांची काळजी म्हणून १ मे रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *