दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप मृत आत्मांना भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल मासुळे यांच्या पुढाकाराने सामुहिक श्रंध्दाजली अर्पण..
भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, मार्गदर्शक ओमप्रकाशजी अग्रवालांसह अनेकांची उपस्थिती
धुळे शहर
निष्पाप भारतीयांवर जम्मू काश्मिरच्या पेहलगाम येथे झालेल्या भिषण दहशतवादी हल्लयात प्राण गमावलेल्या निष्पाप मृत आत्म्यांस शोकमय वातावरणात भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम मंडलच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
धुळे शहरातील चितोड रोड क्रांती चौक येथे २४ एप्रिल रोजी सायंकाळी भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल (बंटी) मासुळे यांच्या वतीने या श्रंध्दाजली सभेचे आयोजन केले गेले.
काश्मीर मधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी जिहादी मानसिकतेच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अतिरेकी हल्ला केला. त्यात २७ हुन अधिक निष्पाप हिंदु नागरिकांचा बळी गेला आणि अनेक नागरिक जखमी झाले. यात महाराष्ट्रातील ६ नागरीक मारले गेले. धर्मनिरपेक्ष तसेच सर्वधर्म समभाव मानणार्या या आपल्या देशातच धर्म विचारून फक्त तो हिंदु आहे, म्हणून त्याची क्रूर हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय संतापजनक निदंनीय असुन माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या बद्दल तीव्र रोष आणि दुःख भारत भरात व्यक्त होत आहे. यासर्व निष्पाप नागरीकांना सामुहिक श्रंध्दाजी अर्पण करीत त्यांच्या हत्येचा बदला भारतीय जनता पक्ष सरकार नक्कीच घेईल असा विश्वास सामुहिक श्रंध्दाजली प्रसंगी भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हाअध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, भाजपा ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक ओमप्रकाशजी अग्रवाल, मदनलाल जी मिश्रा, नानासाहेब जोशी, धुळे जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे, भाजपा सरचिटणीस जितेंद्रजी चौटीया, चेतनजी मंडोरे, मा.नगरसेवक सुनीलजी बैसाने, हर्षकुमार रेलन, सौ.योगिताताई बागुल, शशीशेखर मोगलाईकर, संतोषजी खताळ, भाजपा उप- अध्यक्ष अजयजी अग्रवाल, मनोज शिरूडे, अनिल दीक्षित, प्रदेश अनुसूचित जाती सदस्य प्रदीप पानपाटील, देवपूर मंडल अध्यक्ष प्रथमेशजी गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव बाविस्कर, मधुकर पाटील, सुरेश जाधव, साहेबराव चौधरी, विनायक पुराणिक, वाल्मीक धनगर, वसंत देवरे, सुधाकर येवला, एस आर पाटील, साळुंखे रतन, पी बी धनगर, राजेंद्र राणा, विनायक भोसले, संजय तांदळे, महेश थोरात, धर्मराज बारी, सुरेश अंपळकर, भुरा रगडे, भगवान महाले, विठ्ठल मराठे, सदाशिव पाटील तसेच भाजपा पश्चिम मंडल मधील श्रीकांत पाटील मुकेश थोरात किरण जगताप सचिन पाटील दादा कढरे नितीन आखाडे चंद्रकांत पाटील गोविंदा सोनवणे लक्ष्मण चव्हाण किसन जाधव मंगेश सरगर प्रशांत सूर्यवंशी भटू गवळी रवींद्र सरगर किरण डोमाळे व्यंकटेश निंबाळकर किरण हाके गौरव पाटील राजेश मराठे यश गलांडे हर्षल पाटील दीपक पाटील युवराज गायकवाड आदी उपस्थित होते.