दहशतवादी हल्ल्याविरुध्द धुळ्यात
सकल हिंदू समाजातर्फे तीव्र निदर्शने
धुळे जिल्हा
जम्मू काश्मीर येथील पेहलगाम जिल्ह्यात पर्यटकांवर झालेल्या भिषण अतिरेकी हल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज धुळ्यात तीव्र रोष व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल हिंदू समाजासह विविध हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. यात उमेश चौधरी, हिरामण गवळी, जयश्री अहिरराव, योगिराज मराठे, विजय पाच्छापुरकर, किशोर संघवी, किशोर चौधरी, अनिल थोरात, राजेंद्र खंडेलवाल, बिपीन चौधरी, महेंद्र शेंडगे, हेमंत वानखेडकर, निलेश रुणवाल आदी सहभागी झाले. हे निषेध आंदोलन शांततेत पार पडले.
दरम्यान, या अतिरेकी हल्ल्याच्या घटनेने धुळे जिल्ह्यात सर्वत्र संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. आज शिवसेना, राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्ष तसेच विविध संघटनांनी सुध्दा घटनेचा निषेध करीत आंदोलन केले.