पहलगाम घटना; धुळे जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन
हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
धुळे जिल्हा
जम्मू – काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात धुळे जिल्ह्यातील कुणीही पर्यटक नाही. महाराष्ट्रातील बाधित नागरिकांच्या मदतीसाठी मंत्रालयात राज्य नियंत्रण कक्ष तर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मिर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरील झालेल्या हल्ल्यात धुळे जिल्ह्यातील कुणीही पर्यटक नसल्याबाबत राज्य नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई यांचेकडील प्राप्त पर्यटकांच्या यादीवरुन कळविण्यात आले आहे. तसेच याबाबत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे राज्य नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवून आहे.
*काश्मीरमधील संपर्क क्रमांक :*
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थितीत संपर्क साधता यावा, यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष/आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेथील दूरध्वनी क्रमांक 0194-2463651/ 2457543 व व्हॉटॲप क्रमांक 7780805144/ 7780938397 असा आहे.
राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र (मंत्रालय) मुंबई दूरध्वनी क्रमांक 022-22027990/ 22794229 व भ्रमणध्वनी क्रमांक 9321587143 असा आहे.
तर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे दूरध्वनी क्रमांक 02562-288066, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे भ्रमणध्वनी क्रमांक 8698862890/8788762871 असा आहे. काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.