सुलतानिया गार्डन येथे ओपन ग्रीन जिम, जॉगिंग ट्रॅक सह सुसज्ज गार्डन विकसित होणार
धुळे शहर
खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्यासह सैय्यद मोहम्मद फारुक मियाँ चिश्ती यांच्या शुभहस्ते धुळे शहरातील सुल्तानिया गार्डन विकास कामांचे रविवारी भूमिपूजन करण्यात आले.
मागील जुलै २०२४ च्या महिन्यात हजरत मोहम्मद फारूक मियाँ चिश्ती यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सुलतानिया मदरसा ट्रस्ट, धुळे यांनी धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या कडे सुलतानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रक तयार करणे या कामाचे निवेदन दिले होते. त्याला तात्काळ खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक विकास निधीतून (खासदार निधी २०२४-२५) अंतर्गत १५ लक्ष रुपये मंजूर केले.
धुळे शहरातील सुल्तानिया मदरसा समोरील सुल्तानिया गार्डन विकसित करणे आणि ग्रीन जिम तथा जॉगिंग ट्रक तयार करणे साठी सुलतानिया मदरसा ट्रस्ट, धुळे यांनी १६ जुलै २०२४ रोजी खासदार डॉ.शोभा बच्छाव यांच्या कडे पत्रान्वये मागणी केली होती. त्याला तात्काळ खासदार डॉ.शोभा बच्छाव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक विकास निधीतून (खासदार निधी २०२४-२५) अंतर्गत १५ लक्ष रुपये मंजूर केले. यासाठी सुलतानिया मदरसा ट्रस्ट, धुळे यांनी खासदार बच्छाव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या कामाचे भूमिपूजन काल सुल्तानिया गार्डन येथे सैय्यद मोहम्मद फारुक मियाँ चिश्ती व हजरत हाफिज फारूक चिश्ती साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याची माहिती भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी देण्यात आली. या प्रसंगी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह हजरत मोहम्मद फारूक मियाँ चिश्ती साहेब,मोहम्मद मियाँ चिश्ती साहेब, हजरत फारूक चिश्ती साहेब, हाजी साबीर शेठ, डॉ.दरबार सिंग गिरासे,रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर दादा महाले, सलाम मास्टर, शवाल हाजी, मुजफ्फर हुसेन, सुनिल शिंदे,राजेंद्र खैरनार, गोपाल अंसारी, अफसर पठान, शकील भाई, फारुख भाई पटेल, फैसल अन्सारी आदी मान्यवर तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.