धुळ्यात ‘जय भीम पदयात्रा’उत्साहात संपन्न
*धुळे जिल्हा*
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंतीचे औचित्य साधुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे आणि जिल्हा प्रशासन, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, एनएसएस, एनसीसी, एनवायके, विविध खेळ संघटना तसेच नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘जय भीम पदयात्रा’ उत्साहात संपन्न झाली.
राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती निमित्ताने जिल्हयात ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार धुळे शहरात गरुड मैदान येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर बागुल, श्रीमती मनीषा वानखेडे, क्रीडा अधिकारी श्रीमती रेखा पाटील यांच्या हस्ते पदयात्रेस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
या पदयात्रेत जी.आर.सिटी हायस्कुल, न्यू सिटी हायस्कुल, शिवाजी हायस्कुल, कमलाबाई कन्या शाळा, नेहरु युवा केंद्र, खेळांडू, प्रशिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यात्रेसाठी आलेले विद्यार्थी खेळाडूमार्फत गरुड मैदान येथे संपूर्ण परिसर तसेच बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवडील परिसर ही स्वच्छ करण्यात आला. पदयात्रेची सुरवात गरुड मैदान,धुळे येथुन सुरुवात होवुन जेल रोड मार्गे पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर कोठावदे तर श्रीमती मनीषा वानखेडे यांनी आभार मानले.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी स्वप्निल बोंडे, श्रीधर कोठावदे, योगेश देवरे, प्रभा परदेशी, योगेश पाटील, राहुल देवरे, ज्ञानेश्वर जाधव, दिनेश शिरसाठ, तसेच शाळेतील शिक्षक सुनंदा अहिरे, देविदास मोरे, मनोज चौधरी, महेंद्र गावडे,एस. एम. पाटील, वानखेडे सर ,रवींद्र भामरे, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील योगेश देवरे, दिनेश शिरसाट, योगेश पाटील, राहुल देवरे यांनी परिश्रम घेतले.