श्री पिंपळादेवी यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सव
निमित्त राजेंद्र शिंदे पहेलवान यांच्यातर्फे आयोजन
धुळे – मोहाडी उपनगरात श्री पिंपळादेवी यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदा प्रथमच हरियाणाची सुप्रसिद्ध गुडिया, पंजाबी गायिका व कवयित्री रोनी रमन यांच्या अनोख्या संगीत मैफिलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
धुळे शहराजवळील धुळे मोहाडी उपनगरात श्री पिंपळादेवी यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते, सालाबादा प्रमाणे यंदाही श्री पिंपळादेवी यात्रोत्सव आणि हनुमान जन्मोत्सवाचे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त शनिवार, दि. १२ एप्रिल २०२५ रोजी, रात्रौ ८.०० वाजता, स्थळ : हॉटेल पूनम गार्डन, मोहाडी उपनगर, धुळे. येथे हरियाणाची सुप्रसिद्ध गुडिया, पंजाबी गायिका व कवयित्री रोनी रमन यांच्या अनोख्या संगीत मैफिलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या भक्तीमय संगित कार्यक्रमाचा धुळे शहरातील आणि मोहाडी उपनगरातील समस्त रहिवाशांनी सहपरिवार, मित्रपरिवारसह उपस्थित राहून, या अनोख्या क्षणांचे साक्षीदार होऊन, या अनोख्या संगीत मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन मा. आमदार कुणाल पाटील, माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे, राजेंद्र शिंदे पहेलवान, शुभम अशोक पाटील , आकाश विनायक शिंदे, शुभम राजेंद्र शिंदे, समस्त शिंदे परिवार आणि कै. वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल आणि मित्र परिवाराने केले आहे.
———-