धुळ्यात मुंबई-आग्रा रोडवर गोडाऊन जळून खाक

 

धुळे ब्रेकिंग

धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्ग वरील हॉटेल साहिल च्या पाठीमागे भिषण आग लागली आहे.

येथील प्लास्टिक आणि टायरच्या गोडाऊनला ही मोठी आग लागली आहे. आग एवढी भयंकर असून पन्नास ते साठ फूट उंच आगीचे लोट. उठत असल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच धुुळे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी धाव घेतली असून बंबाद्वारे पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *