राजेंद्र शिंदे यांच्या वतीने सलग २४ व्या वर्षी वणी गडावर जाणाऱ्या भक्तांसाठी उद्या पासून अखंड २४ तास महाप्रसादाचे वाटप

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी
आज पासून अखंड २४ तास महाप्रसादाचे वाटप

श्री. राजेंद्र शिंदे यांच्या वतीने सलग २४ व्या वर्षी भाविकांसाठी महा अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यासह खानदेशातील लाखो कुटुंबाची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी देवी चा चैत्र यात्रा उत्सव सुरू होत आहे. वणी गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी सालाबादाप्रमाणे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक श्री. राजेंद्र शिंदे यांच्या दातृत्वातून बुधवार दिनांक २५ मार्च पासून ते रविवार दि. २९ मार्च असे पाच दिवस अखंड २४ तास सुरु करण्यात येत आहे. महाप्रसाद भंडारा वाटपाचे यंदाचे हे २४ वे वर्ष आहे.

धुळे जिल्ह्यातून आणि शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने तरुण मित्रमंडळी,महिला भाविक, आबालवृद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी वारी सुरू करीत आहेत. या सर्व देवीच्या भक्तांना महाप्रसाद भोजन वाटपाचा कार्यक्रम धुळे शहरातील मालेगाव रोडवरील मोठा हनुमान समोर, गुरुद्वारा चौक बुधवार दिनांक २५ मार्च पासून ते रविवार दि. २९ मार्च असे अखंड पाच दिवस २४ तास आयोजित करण्यात आला आहे.

कै. वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेलचे प्रमुख श्री. राजेंद्र शिंदे पहेलवान यांच्या वतीने दरवर्षी हा अन्नदान भंडारा गडावर पायी जाणाऱ्या साठी देण्यात येतो, सलग बावीस वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे त्याचे यंदा २४ वे वर्ष आहे. महाप्रसाद भंडारा वाटपाला संत महंतांच्या उपस्थित सुरुवात होणार आहे. महाप्रसाद वाटप सोबतच पायी जाणाऱ्या देवीच्या भक्तांना थंडगार पिण्याचे पाणी, आवश्यक औषधे आणि आरामाची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
तरी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविक महिला पुरुष आबालवृद्ध यांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मा. आमदार कुणाल पाटील, माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे, सुरेश शिंदे, राजेंद्र शिंदे पहेलवान, आकाश विनायक शिंदे, शुभम राजेंद्र शिंदे, समस्त शिंदे परिवार आणि कै. वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेल आणि मित्र परिवाराने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *