नगरसेवक बंटी मासुळे यांच्या वतीने ८०१ शिवमुर्तीचे पुजन करीत वाटप करण्यात आल्याने शिवजयंती उत्सव घरोघरी साजरा होणार
धुळे शहर
डिजेचा दणदणाट आणि धागंडधिंग्याला फाटा देत शिवरायांचे अस्सल मावळे छत्रपतींचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी अनोख्या पध्दतीने प्रयत्न करीत असतात. धुळे शहराच्या मिल परिसरातील प्रभाग क्र.१७ चे भाजपाचे नवनिर्वाचीत नगरसेवक तथा पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल (बंटी) मासुळे हे असेच शिवरायांचा एक अस्सल मावळा असून त्यांच्या अभिनव उपक्रमामुळे शिवराय मनामनात, शिवजयंती घरा घरात पोहचली आहे. बंटी मासुळे यांच्या वतीने ८०१ शिवमुर्तीचे पुजन करीत वाटप करण्यात आल्याने शिवजयंती उत्सव घरोघरी साजरा होणार आहे.

दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी धुळे शहरातील चितोड रोडवरील शाळा क्रमांक २८ च्या मैदानावर भव्य शिवजन्मोत्सव सोहळा व शिव व्याख्यान कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. शिवरायांच्या आकर्षक अशा ८०१ मुर्तीचे श्री व्दारकाधिश प्रतिष्ठानच्या वतीने नागरीकांना मोफत वाटप करण्यात आले.

परमगोभक्त तथा श्री द्वारकाधीश प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रबापूजी शेलार तसेच नगरसेवक अमोल मासुळे हे गेल्या तीन वर्षांपासून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करीत आहेत. यंदाचे त्यांचे चौथे वर्ष होते. या वर्षी त्यांनी ८०१ जोडप्यांना छत्रपती शिवरायांची मुर्ती शिवजयंती साजरी करण्यासाठी भेट दिली. आतापर्यंत १६०० हुन अधिक घरांमध्ये छत्रपती शिवराय विराजमान झाले आहेत. छत्रपती शिवराय मनामनात आणि घराघरात पोहचविण्याच्या संकल्पाच्या दिशेने त्यांचे हे एक पुढचे पाऊल म्हणावे लागेल. दरवर्षी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना छत्रपती शिवरायांचे विचार प्रखरपणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ते राज्यातील प्रसिध्द अशा शिवव्याख्यात्यांना आमंत्रीत करतात. यंदा त्यांनी महाराष्ट्राचा महावक्ता पुरस्कार विजेते प्रखर शिवव्याख्याते आकाश पाटील यांना आमंत्रीत केले होते. शिवव्याख्याते आकाश पाटील यांनी शिवरायांचे चरित्र आणि विचार प्रभावीपणे आपल्या व्याख्यानातून मांडले त्यामुळे शिवप्रेमी जनता भारावली.

शिवजंयती घराघरात साजरी करा-अमोल मासुळे
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक बंटी मासुळे यांनी केले. परम गौभक्त मामाश्री रविंद्रबापुजी शेलार, धुळे शहराचे आ.अनुपभैय्या अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेल्या तीन वर्षापासून शिवरायांची जयंती आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात हा विचार आम्ही मांडला. शिवजयंतीच्या चार दिवस आधी आम्ही येथे शेकडो कुटूंबाना एकत्र आणून त्यांना शिवरायांचे विचार सांगून शिवरायांची मुती भेट देत असतो. पहिल्या वर्षी ५०१, दुसर्या वर्षी ६०१, मागच्या वर्षी ७०१ आणि यंदाच्या चौथ्या वर्षी ८०१ मुर्तीचे वाटप आम्ही करीत आहोत. यामुळे मिलपरिसरातील घरा घरात शिवजयंती साजरी व्हावी. प्रत्येकाने आपल्या राजाचे १९ फेब्रुवारीला आपल्या घरात विधीवत पुजन करावे. आपल्या मुलाबाळांसह शिवरायांची जयंती मिलपरिसरातल्या घराघरात साजरी करावी अशी मागणी भावना आहे. यंदाही या कार्यक्रमाल भरघोस असा प्रतिसाद दिल्याबद्दल बंटी मासुळे यांनी जनतेचे आभार मानले तसेच शिवजंयतीला मुर्तींचे पुजन करुन त्याचे फोटो श्री व्दारकाधिश प्रतिष्ठानकडे द्यावेत असे आवाहन देखील केले.

शिवरायांच्या महाआरतीने पसरले चैतन्य
या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. दिपप्रज्वल आणि शिव व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर अतिशय शिस्तबध्दपणे मांडलेल्या शिवमुर्तीचे ८०१ जोडप्यांना वाटप करुन त्या त्या जोडप्याच्या हस्ते शिवमुर्तीचे पुजन करण्यात आले. तसेच एकत्रीतपणे शिवरायांची महाआरती करीत आसमंतात भव्य अशी आतषबाजी केली गेली. छत्रपतींच्या आरती आणि जयघोषाने संपूर्ण मिलपरिसरच दणाणून गेला. शिवरायांच्या नाम घोषाने एक अनोखे चैतन्य पसरले. आलेल्या प्रत्येकाने शिवरायांची मुर्ती अभिमानाने उंचावत अभिवादन करीत नगरसेवक बंटी मासुळे यांच्या उपक्रमाचे कौतुक करीत शिवमुर्ती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

या भव्य सोहळ्याला धर्मयोध्दा आ.अनुपभय्या अग्रवाल,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, नगरसेविका सौ.सुरेखाताई चंद्रकांत उगले, निलेश नेमाणे,सौ.गिताताई नवले, सौ.निशाताई महाजन, सौ.प्रभावतीताई शिंदे, धिरज परदेशी, प्रदीप बैरागी, ऋषीकेश ठाकरे, धिरज कलंत्री, रणजीत भोसले,भाजपा प्रदेश चिटणीस डॉ.सुशिल महाजन, मनपाचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, भाजपचे ज्येष्ठनेते महादेवभय्या परदेशी, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे,उपाध्यक्ष अतुल पाटील, मिल परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळे, गोरख पाटील, जितेंद्र ईखे, किशोर सरगर, बंडू पवार,तुषार नवले, आनंद पाटील, दादा खताळ, जालिंदर जाधव, विकास बाबर, सुनिल पाटील, दिनेश गायकवाड, अण्णा कणसे, सुनिल देवरे,शाहीर गंभिर महाराज बोरसे, राजेंद्र चितोडकर, किशोर शिंदे, अशोक वराडे, महेश थोरात, विलास ढवळे, श्रीरंग जाधव,सुभाष कर्णे, भागवत वाघ, वाल्मिक जाधव, हभप कैलास पवार, मनोज पाटील, सुनिल बडगुजर, भगवान मासुळे, दिग्विजय गाळणकर, सुरेश जाधव, मधुकर पाटील, शरद पाटील, पांडूरंग थोरात, दादा पाटील, विजय बाविस्कर, वाल्मिक मराठे, शांताराम सोनवणे, जितु टेलर, कृष्णा खैरनार, संजय बोरसे, प्रकाश सोनवणे, सतीष बडगुजर, हेमंत चव्हाण, मनोज शिरुडे, किसन जाधव, अशोक जाधव, चंद्रकांत भामरे, योगेश ब्राम्हणकर, अतुल जाधव, सतीश उघडे,दहिवदचे सरपंच गोरख पवार आदी उपस्थित होते.

सुत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री द्वारकाधिश प्रतिष्ठाणचे सन्मानिय सदस्य श्रीकांत पाटील, अमोल पुकळे, मुकेश थोरात, चंद्रकांत पाटील,मनोज सरगर, राजु सुपनर, मारोती सुपनर, लक्ष्मण चव्हाण,सचिन पाटील, भुरा रगडे, गोविंदा सोनवणे, गोपाल रासकर, हनुमंत सुपनर, नितीन आखाडे, विक्की थोरात, घमु पाटील, व्यंकटेश निंबाळकर, विक्की मेकले, भटू गवळी, किरण डोमाळे, पवन अहिरे, राहुल शिंदे, आकाश थोरात, निखिल मराठे, राज सरग, विक्की वाघमोडे, नाना थोरात, सुनिल ठाकुर, मनोज शिरुडे, शुभम मोरे, वनराज पाटील, सदानंद लगड, जितेंद्र गलांडे, नाना थोरात, रितीक वाघ, भटू जिरापुरे यांनी मेहनत घेतली.