निवडणुका झाल्या आता जनतेची कामे करण्यासाठी सज्ज
भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकरांचे धुळेकरांना आवाहन
भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे जनतेत राहून काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. पक्षासाठी स्वतःची कोट्यावधींची जागा देणारे आणि त्या जागेवर चार मजली भव्य जिल्हा कार्यालय बांधणारे गजूशेठ आता या कार्यालयाचा वापर सामान्य धुळेकर जनेच्या सेवेसाठी व्हावा, म्हणून पुढाकार घेत आहेत. त्यांनी थेट लोकांना आपल्या ज्या काही सार्वजनिक जिवनातील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी चाळीसगांव रोडवरील भाजप कार्यालयात संपर्क करण्याचे जाहिर आवाहन केले आहे.

निवडणुका झाल्या आता भाजपला भरभरुन मतदान करणार्या धुळेकर जनतेच्या सेवेसाठी भाजपाचे कार्यालय सदैव खुले असेल, नागरिकांना निरनिराळ्या शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजविण्याची गरज राहणार नाही, कुठलेही राजकारण न करता सेवा हाच अजेंडा असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांनी दिली.
श्री. अंपळकर यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, धुळे महानगरासाठी भाजपा महानगर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या भव्य व आधुनिक वास्तुची निर्मीती झाली असून, हे कार्यालय सर्वांसाठी हक्काचे असणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी नागरी समस्यांचा निपटारा करणारे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे.
नुकत्याच झालेल्या धुळे महानगरपालिका निवडणूकीत धुळेकर जनतेने एकुण ५० नगरसेवक निवडूण देत भाजपा वर विश्वास व्यक्त करून सौ. मायादेवी महादेव परदेशी यांना धुळे मनपाचे महापौर पदी तसेच सौ. ज्योत्सना प्रफुल्ल पाटील यांची उपमहापौर पदी प्रचंड मतांनी निवडून दिलेले आहे. भारतीय जनता पार्टी जनतेच्या या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी, धुळे महानगराचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी, धुळे महानगराचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली धुळे शहर व जिल्ह्यातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच नागरी सेवा सुविधा संबंधीत तक्रारी थेट भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात स्विकारून त्या सोडविण्यासाठी तसेच धुळे शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना निरनिराळ्या शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी येणार्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी व संबंधीत अधिकार्यांशी थेट संपर्क साधून नागरिकांचे कामे मार्गी लावण्याचा संकल्प गजेंद्रशेठ अंपळकर यांनी केला आहे. व त्या अनुषंगाने नागरिकांना निरनिराळ्या शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजविण्याची गरज राहणार नाही, कुठलेही राजकारण न करता सेवा हाच अजेंडा असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांनी दिली.

प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना.गिरीषजी महाजन यांच्या आशिर्वादाने तसेच धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमारजी रावल यांच्या नेतृत्वात, धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैय्या अग्रवाल, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार राम दादा भदाणे, मा. केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, मा. आमदार राजवर्धनजी कदमबांडे, मा. आमदार कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने धुळे महानगरासाठी भाजपा महानगर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या भव्य व आधुनिक वास्तुची निर्मीती झाली असून, हे कार्यालय सर्वांसाठी हक्काचे असणार आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी नागरी समस्यांचा निपटारा करणारे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे.
पुढील समस्या असतील तर संपर्क साधा
१. पाणीपुरवठा विभाग (अनियमीत पाणी पुरवठा, पाण्याची गळती, नळ पाणी कनेक्शन)
२. ड्रेनेज, गटार व सोसखड्डा समस्या.
३. सार्वजनिक स्वच्छता, घनकचरा व घंटागाडी समस्या.
४. स्ट्रीट लाईट संदर्भात समस्या.
५. रस्ते, खड्डे, फुटपाथ संदर्भातील कुठल्याही समस्या.
६. आरोग्य विभाग, डास प्रतिबंध फवारणी, मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त.
७. महापालिका सेवा व तक्रारी
८. रेशन कार्ड संदर्भातील समस्या.
९. सिटी सर्व्हे व उतार्या संदर्भातील तक्रारी.
१०. सिव्हील हॉस्पीटल धुळे व शासकीय रुग्णालयातील समस्या.
११. खाजगी रुग्णालयातील तक्रारी व मार्गदर्शन.
या सर्व समस्यांचे नागरिकांना एकाच ठिकाणी प्रशासकीय संबंधातील विभागाशी थेट समन्वय, तक्रारीचा वेळेत निपटारा व समाधानासाठी उद्यापासून भाजपा कार्यालयात सुरुवात करीत आहोत असे आश्वासन भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी दिले आहे.