धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

धुळे जिल्हा

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) धुळे (Dhule) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, संदीप पाटील, चंद्रशेखर देशमुख,उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव खेडकर, तहसिलदार प्रविण चव्हाणके यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पोलिस दलाच्यावतीने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *