नगरसेवक भगवान आप्पा गवळी यांची प्रतोद पदी नियुक्ती!
धुळे शहर
धुळे महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्षाने आज महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आपल्या 50 नगरसेवकांची गट नोंदणी केली तसेच गटनेतेपदी प्रभाग क्रमांक दहा मधून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या नगरसेविका सौ किरण ताई राकेश कुलेवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच भगवान आप्पा गवळी यांची प्रतोद पदी नियुक्ती देखील केली आहे.

धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा प्रचंड असे बहुमत मिळवीत एक हाती सत्ता प्राप्त केली आहे. भाजपाचे 50 नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले. आता सर्वांचे लक्ष महापालिकेतील सत्ता स्थापन कडे लागले आहे. यासाठी आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची गट नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच महापालिकेतील गटनेते पदी एकमताने सौ किरण ताई राकेश फुलेवार यांची निवड करण्यात आली. सौ किरण ताई कुलेवार या माजी स्थायी समिती सभापती देखील आहेत. त्यांना गटनेतेपदासारखी महत्त्वपूर्ण जबाबदारी भाजपाने देऊन महापालिकेत ‘महिला राज’ ची नांदी केल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे धुळे महापालिकेच्या महापौर पदाचेही आरक्षण जाहीर झाले असून सर्वसाधारण खुल्या गटातील महिला नगरसेविकेला महापौर पदाची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे महापालिकेत खऱ्या अर्थाने यावेळी महिलाराज अवतरणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या सत्तावीस नगरसेविका निवडून आले आहेत भाजपाने या निवडणुकीत सर्वाधिक महिला उमेदवार दिला होत्या आणि सर्वात जास्त नगरसेविका देखील भाजपाच्याच निवडून आले आहेत. त्यामुळे पक्षाने गटनेते पदासारखी महत्त्वाची जबाबदारी एका महिला नगरसेविकेवर सोपवल्याने एक चांगला संदेश यानिमित्ताने धुळे शहरात गेला आहे.

दरम्यान आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रतोद पदावर ज्येष्ठ नगरसेवक भगवान आप्पा गवळी यांची देखील नियुक्ती केली आहे. भगवान आप्पा गवळी हे देखील सलग सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत आज गटनेते आणि प्रतोद निवडीनंतर दोन्ही मान्यवरांचा भाजपच्या सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच नेतेमंडळींनी अभिनंदन करीत सत्कारही केला आमदार अनुप अग्रवाल महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंबळकर ज्येष्ठ नगरसेविका तथा माजी महापौर जयश्रीताई अहिराव प्रतिभाताई चौधरी कल्पना महाले डॉक्टर निशा महाजन कल्याणी ताई आंपळकर तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी त्यांचे अभिनंदन केले.