मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानामुळे
धुळे जिल्ह्यात विकासाची लोक चळवळ निर्माण झाली : सोनाली कुलकर्णी यांच्याकडून कौतुक
धुळे जिल्हा : Dhule District
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये खूपच चांगली आणि रचनात्मक कामे झाली असून त्यांचे हे काम प्रशंसनीय आहे. या अभियानाला मिळालेला लोकसहभाग पाहता येथे विकासाची लोक चळवळ निर्माण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले अशा भावना प्रख्यात सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आज येथे व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत विविध विकास कामे सुरू आहेत. या अभियानाला अधिक बळ मिळावे, ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कामांना प्रोत्साहन मिळावे, तसेच लोकसहभाग वाढावा या उद्देशाने प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी बुधवारी दि.२१ जानेवारी 2026 रोजी खलाणे (ता. शिंदखेडा) वाठोडे, बोराडी (ता. शिरपूर) ह्या ग्रामपंचायतीना भेट देवून कामाची पाहणी केली . त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय पडोळ, गटविकास अधिकारी श्री प्रदीप पवार , गटविकास अधिकारी श्री रमेश नेतनराव, धुळे गटविकास अधिकारी श्री गणेश चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

खलाणे येथे बैलगाडी वरून मिरवणूक
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत बुधवारी सकाळी खलाणे ता. शिंदखेडा येथून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या दौऱ्याला सुरवात झाली . खलाणे येथे सजवलेल्या बैलगाडीतून सोनाली कुलकर्णी यांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी पाहण्यासाठी पंच क्रोशीतील हजारो लोकांनी गर्दी केली होती. यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हण्याली कि, या अभियानात आपल्या गावाने केलेल्या कामाची राज्यस्तरावर चर्चा आहे . ते ऐकूनच आम्ही आज येथे आलो आहोत. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्तिक परिश्रमाचे हे फलित आहे. या अभियानाच्या माध्यमातून विकासाची लोकचळवळ निर्माण झाल्याचे इथे पाहायला मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री नारायण पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री राजन पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजय पडोळ गटविकास अधिकारी श्री रमेश नेतनराव, धुळे गटविकास अधिकारी श्री गणेश चौधरी, सहायक गटविकास अधिकारी श्री नितीन खंडेराय, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री पंकज कदम, श्री विजय टाटिया, विस्ताराधिकारी पी एस महाले , श्री कपिल वाघ , सरपंच रत्नाबाई शामू भिल , उपसरपंच पुनमबाई प्रवीण भदाणे, ग्रामविकास अधिकारी एस एस पाटील यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती सरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी गावाने केलेल्या विविध विकासकामांची तसेच राबविलेल्या उपक्रमांची पाहणी करीत कौतुक केले . त्यानंतर त्यांनी वाठोडे, बोराडी ता.शिरपूर या गावांना भेटी देवून विविध कामांची पाहणी केली.

वाठोडे येथील कामांची
मुक्त कंठाने प्रशंसा
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत शिरपूर तालुक्यातील वाठोडे ग्रामपंचायतीला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भेट देवून विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सोनाली कुलकर्णी यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी सारा गाव एकवटल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नारायणसिंग चौधरी व ग्रामपंचायत अधिकारी शरद कोळी यांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गावाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. वाठोडे गाव निसर्ग रम्य परिसरात असून अतिशय सुंदर आहे. आगामी काळात पर्यटन स्थळ म्हणून गावाचा नावलौकिक होवो. धुळे जिल्ह्यात सुरु असलेली कामे ही प्रशंसनीय असून इतरांनी आदर्श घ्यावीत असे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेश इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती स्नेहा पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री देवेंद्र पाटील गटविकास अधिकारी श्री प्रदीप पवार, सहायक गटविकास अधिकारी श्री आर के गायकवाड, गट शिक्षणाधिकारी श्रीमती निता सोनवणे , यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते .