लाडकी बहिण योजना : महिलांसाठी महत्वाची सूचना

 लाडकी बहिण योजना : e-KYC करणाऱ्या महिलांसाठी महत्वाची माहिती !

मुंबई

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा सरकारकडून एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना मुख्यतः इकेवायसी करणाऱ्या महिलांसाठी आहे. ज्यांचे पैसे केवायसी केल्यानंतरही येत नाही आहेत त्यांना महत्त्वपूर्ण अशी सूचना राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.

तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *