ग्राम विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उद्या धुळे जिल्ह्यात

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उद्या धुळे जिल्ह्यात खलाणे, वाठोडे, बोराडी ग्रामपंचायतला भेट देणार

धुळे जिल्हा : Dhule District

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत विविध विकास कामे सुरू आहेत. या अभियानाला अधिक बळ मिळावे, ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कामांना प्रोत्साहन मिळावे, तसेच लोकसहभाग वाढावा या उद्देशाने प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) उद्या दि.२१ जानेवारी 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील खलाणे (ता. शिंदखेडा) वाठोडे, बोराडी (ता. शिरपूर) ह्या ग्रामपंचायतीना भेट देणार आहेत.

धुळे जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत विविध विकास उपक्रम राबविण्यात येत आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सेवा, महिला सक्षमीकरण, आरोग्य व शिक्षण विषयक अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाला अधिक बळ मिळावे, ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण कामांना प्रोत्साहन मिळावे, तसेच लोकसहभाग वाढावा या उद्देशाने प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उद्या दि.२१ जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान खलाणे (ता. शिंदखेडा) येथे विविध विकास कामांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत वाठोडे (ता. शिरपूर) ग्रामपंचायतीला भेट देणार आहेत. गावातील विविध विकासकामांची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

तसेच दुपारी 3.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान श्रीमती सोनाली कुलकर्णी बोराडी ता. शिरपूर येथील विकास कामांची पाहणी करून ग्रामस्थांना संबोधित करणार आहेत.

या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. त्या ग्रामपंचायत प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीमुळे ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या विकास कामांना नवीन प्रेरणा मिळणार असून महिला, युवक व ग्रामस्थांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *