अमोल मासुळे, सुरेखा उगले, उज्वला भोसले, आणि ज्योत्सना पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा !!
धुळे : Dhule
राज्य निवडणूक आयोगाने धुळे महापालिकेच्या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड होत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी याबाबतचे लेखी पत्र धुळे महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस यांना दिले आहे.
यामुळे आता भाजपाच्या अमोल मासुळे, सुरेखा उगले, उज्वला भोसले, आणि ज्योत्सना पाटील या चार उमेदवारांना बिनविरोध नगरसेवक होण्याचा मान प्राप्त झाला आहे. तसेच यांच्या निवडीवर घेण्यात आलेले वेगवेगळे आक्षेपही निष्प्रभ ठरले आहे कोर्टात कोर्टात केलेल्या नेत्यांना सुद्धा मोठी चपराक यामुळे बसली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे की, धुळे महानगरपालिकेच्या जागा क्र. १-अ, ६-ब, १७-अ व १७-ब वरील ४ उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहिर करण्याकरीता राज्य निवडणूक आयोगाने संदर्भाधिन पत्र क्र. ३ अन्वये विहित केलेल्या नमुन्यात आपण माहिती सादर केली आहे. सदर ४ जागांवर बिनविरोध निवडून येताना इतर उमेदवारांवर १) दबाव आणणे, २) आमिष दाखवणे, ३) अन्य लेखी तक्रार, ४) निवडणुकीसंदर्भातील न्यायालयीन प्रकरण यापैकी कोणतीही बाब निदर्शनास आली नसल्याचा अहवाल आपण सादर केला आहे. त्यास अनुसरून खालील उमेदवारांना बिनविरोध निवडून आल्याचे जाहिर करण्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता आहे.
१. उज्वला रणजित भोसले (भारतीय जनता पक्ष) जागा क्र. १-अ
२. पाटील ज्योत्स्ना प्रफुल्ल (भारतीय जनता पक्ष) – जागा क्र. ६-ब
३. मासुळे अमोल पावबा (भारतीय जनता पक्ष) जागा क्र. १७-अ
४. उगले सुरेखा चंद्रकांत (भारतीय जनता पक्ष) जागा क्र. १७-ब याचा समावेश आहे.