सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आयोजित क्रीडा स्पर्धाचे धुळ्यात उद्घाटन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आयोजित क्रीडा स्पर्धाचे धुळ्यात उद्घाटन

धुळे जिल्हा

सामाजिक न्याय व विशेष साहाय विभागातर्फे विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आज धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंनी उत्साहाने, खिलाडूवृत्तीने खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यावेळी केले.


कार्यक्रमास राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, नाशिक माधव वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, महिला व बाल विकास विभागाचे परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, विशेष अधिकारी (शानिशा) राजेंद्र कांबळे, श्रीमती सविता लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.


अनुसूचित जाती आिए नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर येथील एकूण १० शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.


याप्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, तुम्ही येथे केवळ स्पर्धेसाठी नव्हे, तर मनोरंजनासाठी एकत्र आले आहात. सर्व खेळाडूंनी उत्साहाने, खिलाडूवृत्तीने आणि आनंदाने खेळाचा आनंद घ्यावा. आयोजकांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. विजय किंवा पराभव कोणताही असो, परस्पर मैत्री, सलोखा आणि खेळभावना कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पथसंचलन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेशचंद्र दराडे यांनी केले, तर मनोजकुमार देवरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *