सुलभ शौचालयांचा मलिदा खाणारे महाभाग कोण?
धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा महाकळस – शिवसेना उबाठा
धुळे
धुळे महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आदिवासी वस्तीतील चक्क 10 सीट संख्या असलेले सुलभ शौचालय चोरीला गेले असून, सुलभ स्वच्छालयाचा मलिदा कुणी मिळून खाल्ल ? असा प्रश्न आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महानगरपालिका आयुक्त व तसेच प्रभाग क्रमांक ६ चे भाजपाचे माजी नगरसेवक यांना विचारला आहे.
सन 2021-22 मध्ये प्रभाग क्रमांक सहा येथे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाने गावातील आदिवासी वस्तीत श्री मगन मातंग यांच्या घराजवळ महिलांसाठी दहा सीट सार्वजनिक शौचालय बांधणे मकामासाठी 19,98,878, रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या सुलभ शौचालयांचे मे .आदर्श कन्स्ट्रक्शन यांनी 09-02-2023 रोजी पूर्ण करून धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीतून 19लाख 98878 हजार रुपयांचे कामाचे बिल देखील काढून घेतले आहे,
यासंदर्भात शिवसेनेचे विधी व न्याय विभागाचे प्रमुख एड. भूषण उर्फ बंटी पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात नकाने गावात कोणकोणती विकासाची कामे करण्यात आली त्यासंदर्भात महानगरपालिकेकडून माहिती मिळवल्यानंतर कामांची चौकशी केल्यावर सदर प्रकार त्यांनी उघडकिस आणला.
या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एड.बंटी पाटील, भरत मोरे, प्रशांत भामरे, कपिल लिंगायत, अनिल शिरसाट, तेजस सपकाळ आदींनी संबंधित ठिकाणी भेट देऊन सुलभ शौचालयां विषयी ती कुठे बांधली आहेत अशी विचारणा आदिवासी वस्तीत जाऊन केल्यावर, या वस्तीतील रहिवाशी व ज्यांच्या नावाने उल्लेख आहे त्या श्री मगन मातंग यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले नसून आजही आदिवासी वस्तीतील महिला भगिनी ह्या प्रात:विधीसाठी उघड्यावर जातात. सुलभ शौचालयांचा हा प्रकार आदिवासी वस्तीतील बांधवांना कळाल्यावर त्यांनी यावेळी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तब्बल वीस लक्ष रुपयांचा हा भ्रष्टाचार धुळे महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित प्रभागाचे इंजिनियर व स्थानिक माजी नगरसेवक यांनी संगम मताने केला असून, आतापर्यंत भ्रष्टाचाराचे अनेक किस्से धुळे महानगरपालिकेत होऊन गेले असताना सुलभ शौचालयांमधील विष्टा, विष्टेचा मलिदा खाण्यापर्यंत आता महानगरपालिका प्रशासनाची मजल गेली असून याप्रकरणी लवकरच देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यात सुलभ शौचालय हरवल्याची तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे एड. बंटी पाटील यांनी सांगितले आहे. या संदर्भात शिवसेना उबाठा वतीने महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत तक्रार करण्यात आली असून धुळे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारी कारभाराच्या या प्रकरणा विरोधात शौचालयांची विष्ठा खाणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात आला.