>धुळे जिल्ह्यात वादळी पाऊस, नेर परिसरात गारपिटीने पिकांचे नुकसान

*धुळे ब्रेकिंग

धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊसाने धुळे जिल्ह्यात जोरदार तडाखा दिला आहे. धुळे तालुक्यातील नेर गावासह परिसरात  गारपीट होऊन पावसाने झोडपून काढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

धुळे जिल्ह्यात बुधवारी सांयकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुळे शहर, धुळे तालुक्यातील गाव खेड्यात पावसाने आणि गारपिटीने शेतीला तडाखा बसला.  काही ठिकाणी गगहू हरभरा मका पिकाला फटका बसला आहे.

<span;>तसेच शिंदखेडा तालुक्यात जोरदार  वादळात केळी आणि पपईचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे.

<span;>धुळे शहरात विजेच्या कडकडाट सह रिमझिम पाऊस बरसला असून शहरातील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *