धुळे जिल्हा
साक्री शहरातील लोकमान्य नगरात थेट घरात चालवण्यात येणारा बनावट दारू कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उध्वस्त केला आहे. या कारवाईत दोन लाख 66 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र हा कारखाना थाटणारा श्रीराम बाबर नामक संशयित फरार झाला आहे.
नलिनी संजय जगताप हिच्या राहत्या घरात वरच्या मजल्यावर लोकमान्य नगर साक्री येथे श्रीराम मोतीराम बाबर हा बेकायदेशीररित्या बनावट देशी/विदेशी दारू निर्मितीचा कारखाना चालवून चोरट्या मार्गाने अवैद्यरीत्या खुल्या बाजारात विक्री करतो अशी गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणी बनावट देशी/विदेशी दारू तयार विदेशी ब्लेंड, व बनावट दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा एकूण २ लाख ६६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरार आरोपी श्रीराम मोतीराम बाबर यांच्या विरुद्ध म.दा. का. १९४९ चे कलम कलम ६५ (ब,क,ड.ई,फ), ८१, ८३,९०,१०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई बी.व्ही. हिप्परगेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक धुळे, सोबत अनिल.बी.निकुंबे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक धुळे तसेच वाहन चालक वी. बी. नाहीदे जवान सर्व श्री, मनोज धुळेकर, मयूर मोरे, दीपक अहिरराव, कल्पेश शेलार, यांचे पथकाने सदरची कार्यवाही केली असून सदर गुन्ह्यातील पुढील तपास. बी.व्ही. हिप्परगेकर निरीक्षक रा.ऊ.शु भरारी पथक धुळे हे करत आहे.