ठेकेदाराच्या परिवारावर विषप्रयोग पत्नी, मेहुणीवर गुन्हा

धुळे जिल्हा

फागणे (ता.धुळे) येथील ठेकाकेदारासह त्याच्या आई-वडील आणि भाऊ,भाचा,भाची यांच्यावर अन्नातून विष प्रयोग केल्याच्या संशयावरून संबंधित ठेकेदाराची पत्नी आणि मेहुणी यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सत्यभामाबाई शशिकांत पाटील व आशाबाई गणेश शिरसाठ रा.पारोळे कमान चितेगांव (ता.जि.छत्रपती संभाजी नगर) अशी संशयित महिलांची नावे आहेत.

या दोघांनी ३० मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेला शशिकांत कमलाकर पाटील (वय ३६ वर्षे) रा. इंदिरा नगर फागणे (ता.धुळे) यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर  अन्नातून विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला.

शशिकांत पाटील यांनी फिर्यादित म्हटले आहे, की त्यांच्या राहते घरी (फागणे ता.धुळे) येथे त्यांची पत्नी सत्यभामाबाई शशिकांत पाटील आणि तीची बहिण अषाबाई गणेश शिरसाठ यांनी वरण-भात,कैरीची भाजी, मिरचीची भजी आणि  गव्हाची चपाती असा स्वयंपाक केला.

त्यात संगणमतांने काहीतरी विषारी पदार्थ मिसळून त्यांनी शशिकांत पाटील यांना खा घातले यानंतर  पाटील यांच्या आई-वडील, भाउ, भाचा आणि भाची यांनाही खाऊ घातल्याने सर्वाना विषबाधा झाली.यातून सर्वाना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *