धुळे शहरात ’नो हॉकर्स झोन’च्या मागणीसाठी व्यापारी महासंघाच्या मूक मोर्चाला मोठा प्रतिसाद

धुळे जिल्हा

धुळे शहरातील जुना आग्रारोड फेरीवाला मुक्त अर्थात ’नो हॉकर्स झोन’ कायम राखला जावा तसेच महापालिकेच्या ’नो हॉकर्स झोन’ची प्रभागी अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी व्यापारी महासंघातर्फे आज १८ सप्टेंबर रोजी सकाळी धुळे शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चाला धुळेकरांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद देत मोर्चात सहभाग घेतला. तसेच व्यापारी, व्यावसायिकांनी दुपारी एक वाजेपर्यंत पेठ भागासह धुळे शहरातील विविध भागातील आपली दुकाने ही बंद ठेवल्याने सकाळपासूनच गजबणारा पेठ परिसरात शुकशुकाट दिसून आला.


धुळे शहरातील मध्यवर्ती भागातून जाणार्‍या मुख्य मार्ग असलेल्या आग्रारोडवर रहधारीस अडथळा ठरणारे लोडगाडीधारक व्यावसायीक, भाजी आणि फळ विक्रेते यांनी दुसरीकडे आपले व्यवसाय करावेत अशी मागणी करीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात व्यापारी, व्यावसायिकांसोबतच शहरातील वकील, अभियंता, डॉक्टर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अनेक धुळेकर नागरीक देखील उत्स्फुर्तपणे सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला मोर्चा आग्रारोडने सरळ कराचीवाला खुंट, महापालिका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तसेच व्यापारी महासंघाच्या शिष्ठ मंडळाने जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना एक निवेदनही दिले.


या निवेदनात म्हटले आहे की, धुळे महानगरपालिकेच्या २४ एप्रिल २०१८ च्या ठराव क्र. ११० नुसार शहरातील फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्र बाबत निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयाची अंमलबजावणी निरंतर सुरू रहावी ही विनंती.
रहदारीतील सुलभता आणि सुसुत्रता शहरातील शांतता व सलोखा आबादीत ठेवण्यास सहयोगी ठरते व याचाच विचार करून मनपाने वरील निर्णय घेतला आहे व पोलिस विभागाकडुन याची व्यवस्थित अंमलबजावणी केली जात आहे ती अखंडीत सुरू राहावी ही विनंती.
हॉकर्स बांधवांसाठी कायम स्वरूपी मार्केटच्या योजनेची पुर्तता होईपर्यंत महानगरपालिकेच्या विविध भागातील जागांवर पुर्नवसन करावे तसेच मनपाच्या ठराव क. ११० नुसार त्वरीत कारवाई व्हावी. रहदारीच्या रस्त्यावर व्यवसाय न करण्याबाबत व करदात्यांच्या सुलभ व्यवसायाच्या शासनाच्या आदेश व नियमांचे काटेकोर पालन व्हावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *