आयुष्यमान कार्ड, वयोवृध्दांसाठी वय वंदना कार्ड तयार करण्यास प्रारंभ, मिलपरिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा-अमोल मासुळे

आ.अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मिलपरिसरात “आरोग्याचा श्रीगणेशा” 

मा.नगरसेवक बंटी मासुळे यांच्या संपर्क कार्यालयात झाला मोहिमेचा शुभारंभ

धुळे शहर

आ. अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणार्‍या आरोग्याचा श्रीगणेशा ही विशेष मोहीमेचा मिलपरिसरात आज शुभारंभ करण्यात आला. भाजपा पश्‍चिम मंडल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या संपर्क कार्यालयात असंख्य नागरीकांच्या उपस्थितीत ही मोहिम सुरु झाली. यावेळी मिलपरिसरातील महिला भगिनी, वयोवृध्द नागरीकांसह अनेकांना आयुष्यमान कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करून देण्यासाठी नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. ७० वर्षाहून अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरीकांना वय वंदना कार्ड बनवून देण्यात येत असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी क्रांती चौक, चितोड रोड येथील भाजपा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी मंडल अध्यक्ष अमोल उर्फ बंटी मासुळे यांनी केले आहे.

एबी फाउंडेशन, महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी, धुळे महापालिका व धुळे जिल्हा परिषदेतर्फे आरोग्याचा श्रीगणेशा ही विशेष मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. आ.अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त १३ सप्टेंबरपर्यंत चालणार्‍या या विशेष मोहिमेत शहरातील नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करून देण्यासह त्याचे वाटप करण्यात येत आहे. क्रांती चौक चितोड रोड येथील बंटी मासुळे यांच्या कार्यालयात मोहिमेचा प्रारंभ आज १ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आला. यावेळी नागरीकांच्या नाव नोंदणीसह ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया करण्यात आली. यावेळी ए.बी. फाउंडेशन चे कमलेश देवरे व आशा वर्कर सुरेखा थोरात, उमा कोळवळे, उमा नंदाने, वैशाली पाचपुते, कल्पना अहिरे, सुनीता मोहिते, सुरेखा शेळके, सुरेखा घाडगे यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून २०१८ पासून ’आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ राबविली जाते. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांना सरकारकडून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड देण्यात आले आहे. या योजनेतून लाभार्थ्याला ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. तसेच राज्य शासनातर्फे महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत प्रतिकुटुंब दर वर्षी दीड लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण दिले जाते आणि हे एकात्मिक आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट आहे.


*वयोवृध्दांसाठी वय वंदना कार्ड मिळणार*
याशिवाय ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनातर्फे आयुष्यमान वय वंदना योजनेंतर्गत विविध रुग्णालयांत वैद्यकीय सेवेचा लाभ दिला जातो. अजूनही ज्यांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड अथवा ७० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार झालेले नाही, ज्यांना कार्ड मिळविण्यात अडचणी, समस्या येत आहेत अशा धुळे शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवून हे कार्ड तयार करून देण्यासह त्यांचे वाटप करण्यात येत आहे. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त २७ ऑगस्टपासून ही विशेष मोहीम सुरू झाली असून, ती १३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व आयुष्यमान वय वंदना कार्ड योजनेंतर्गत एक हजार ३५६ आजारांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत आरोग्यसेवेसाठी दोन हजार ३०० हून अधिक अंगीकृत रुग्णालये समाविष्ट आहेत.

*आशा वर्कर्स, स्वयंसेवक ही सज्ज*
वंचित नागरिकांना आयुष्यमान कार्ड बनवून देण्यासाठी धुळे महापालिका, धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५० आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, तसेच १५० स्वयंसेवक राबत आहेत. तसेच हे कार्ड तयार करण्यासाठी १५० सीएससी सेंटर, २६ अंगीकृत रुग्णालयांचेही सहकार्य लाभत आहे. ही दोन्ही कार्ड बनविण्यासाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार कार्ड व आधार क्रमांकाला संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त २७ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरदरम्यान आरोग्यची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड, आयुष्यमान वय वंदना कार्ड तयार करण्यासाठी मिलपरिसरातील नागरीकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि कार्ड बनवून देण्यात येत असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी क्रांती चौक, चितोड रोड येथील भाजपा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी मंडल अध्यक्ष अमोल उर्फ बंटी मासुळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *