तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व मदतीमुळे अध्यक्ष झालो, वकील बांधवांचे प्रश्न सोडविणार – ॲड. अमोल सावंत
धुळे शहर
धुळ्याच्या सुपुत्राची थेट महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने ॲड. अमोल सावंत यांचा जंगी असा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अनेक ज्येष्ठ वकील बांधवांनी मनोगत व्यक्त करत सावंत यांना शुभेच्छा दिल्या.
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, मदतीमुळे अध्यक्ष झालो आहे. मी अध्यक्ष म्हणजे पूर्ण धुळ्याचे वकील अध्यक्ष झाले आहे. येणाऱ्या काळात वकील बांधवांचे विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. अमोल सावंत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
ॲड. सावंत यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने भर पावसात धुळे जिल्हा वकील संघाने त्यांचा जंगी असा सत्कार करत औक्षण केल आहे. धुळे जिल्हा बार कौन्सिलच्या या अभूतपूर्व सत्कारामुळे सावंत यांनी बार कौन्सिलचे आभार व्यक्त केले आहे. वकील बांधवांच्या इमारतीचा प्रश्न, वकील संरक्षण कायदा, यांसह विविध प्रकारचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची प्रतिक्रिया ॲड. अमोल सावंत यांनी दिली आहे.
याप्रसंगी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड राहुल पाटील, धुळे जिल्हा ग्राहक मंच वकील संघाचे अध्यक्ष ॲड वाल्मीक कचवे पाटील, उपाध्यक्ष ॲड. मधुकर भिसे, ॲड. दिलीप पाटील, ॲड. अमोल पाटील, ॲड जितेंद्र निळे, ॲड. श्याम पाटील, ॲड. सुरेश बच्छाव, ॲड. डीजी पाटील, ॲड. आनंद जगदेव, ॲड. एम एस पाटील, ॲड. भाऊ देशपांडे, ॲड. रविंद्र पवार, ॲड. नितीन पाटील, ॲड. समीर सोनवणे, ॲड. राजेंद्र गुजर, ॲड. सुरेश बागुल, ॲड. कुंदन पवार, ॲड. दिनेश गायकवाड, ॲड. राहुल भामरे, ॲड. अश्विनी पवार, ॲड. शिवप्रिया पाटील, ॲड. प्रतिक्षा शिंदे, यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.