धुळे जिल्हा
कर्जदार सभासदांनी ३१ मार्च पर्यंत किंवा त्यापूर्वी खरीप कर्जाचा भरणा केल्यास केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना तीन लाख कर्जापर्यंत शुन्य टक्के व्याज असेल अशी माहिती देत बँकेच्या शेतकर्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात चालू पिक कर्जाची एकूण ९०%, मार्च आणि जून २०२५ अखेर ९२.% व्याजासह कर्ज परतफेड केल्याचे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ. राजवर्धन कदमबंाडे यांनी सांगितले.
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६८ वी सर्वसाधारण सभा झाली. यावेळी बँकचे चेअरमन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे बोलत होते.
यावेळी उपाध्यक्ष दिपकभाई पुरुषोत्तम पाटील, संचालक आमदार शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक, आमदार चंद्रकांत बटेसिंह रघुवंशी, आमदार आमशादादा फुलजी पाडवी, माजी आमदार शरद माधवराव पाटील, भरतभाई बबनराव माळी, दर्यावगीर दौलतगीर महंत, शामकांत रघुनाथ सनेर, हर्षवर्धन शिवाजीराव दहिते, भगवान विनायक पाटील आदींसह बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्वसाधरण सभेत धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वर्षभराचा कामकाजाचा सविस्तर लेखाजोखा सादर करण्यात आला. सतत ११ वर्षापासुन बँकेस ’ब’ ऑडिट वर्ग मिळाला आहे. बँकेचा सन २०२४-२५ वर्षात सीआरएआर १२.९२ % आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात बँकेचे स्वतःचे १८ एटीएम सेंटर असून नियमित कार्यान्वित आहेत. बँकेच्या सर्व शाखांमधेमायक्रो एटीएम सुविधा सुरु करण्यात आली आहे.वि.का. सह.संस्था व आदिवासी वि.का.सह. संस्थांना ११६ मायक्रो एटीएम मशिनद्वारे व्यवहार करणेसाठी देण्यात आले आहेत. एफआयएफ फंडातील अर्थ सहाय्यातून बँकेस एकुण दोन नग एटीएम व्हॅन मंजूर झाले आहेत या मार्फत दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व खेड्यापाड्यात एटीएम कॅनद्वारे बँकिंग सेवा देण्यात येत आहे.
महिला व पुरुष बचतगटांना जास्तीत जास्त ६.० लाखापर्यत कर्ज पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत बँकेने एकूण ३९२९ बचतगटांना कर्ज पुरवठा केला कायदाजित ९२ ते ९३% वसुली होत आहे. छोटे व्यवसायीक यांना जेएलजी अंतर्गत कर्ज पुरवठा केला जात आहे. बँकेने मख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत सर्व शाखांमध्ये रुपये १०० भरून केवायसी पूर्तता करून खाते उघडण्याची सुविधा सुरु केली आहे. अशी माहिती देण्यात आली.