धुळ्यात भाजपच्या राजाचे जल्लोषात आगमन

 

धुळे जिल्हा

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात यंदा प्रथमच गणेश उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त धुळ्यातील आग्रारोडवरील श्रीराम मंदिर येथून भाजपच्या राजाची एक दिवस आधीच मिरवणुक काढण्यात आली.

फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून भाजपाच्या राजाची मिरवणुक निघाली. ढोल पथकासह पारंपारीक वाद्य गणरायाच्या आगमनाच्या साक्षीला होते.

अत्यंत दिमाखदार पध्दतीने सवाद्य काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने गणराज भक्तांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुक एक दिवस आधी काढण्याबाबतची भुमीका स्पष्ट करताना जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर म्हणाले की, उद्या गणरायाची स्थापना घराघरांमध्ये मंडळांमध्ये होत आहे. त्यामुळे आमचे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्या त्या भागातील गणेश मंडळाच्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज राहतील. म्हणूनच आज आम्ही भाजपचा राजाची मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला. तसेच अनंत चतुर्दशी ऐवजी त्याच्या एक दिवस आधी विसर्जन मिरवणुक काढण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *