वाचकांच्या भेटीला येणार “पट्यारा”

वाचकांच्या भेटीला येणार “पट्यारा

धुळे,येथील संतोष शिंदे लिखित “पट्यारा” या आत्मकथनपर पुस्तकाचे डॉ.शरद बाविस्कर
(फ्रेंच तत्त्वज्ञान जेएनयु,दिल्ली) यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

गुरुवार (दि.३ एप्रिल २०२५) रोजी सकाळी १० वाजता हॉटेल झंकार पॅलेस, गुरूद्वारा जवळ (मुंबई-आग्रा रोड) मनोविकास प्रकाशित आत्मकथनपर पुस्तकाच्या या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष प्रसिध्द लेखक बालाजी सुतार (बीड) हे असतील.प्रमुख अतिथी अलका धुपकर (ज्येष्ठ पत्रकार,मुंबई) उपस्थित असतील.

यंग फाऊंडेशन (धुळे) व रविंद्र शिंदे मित्र परिवार हे या समारंभाचे आयोजक आहेत.कार्यक्रम स्थळी सवलतीसह पुस्तक विक्रीस उपलब्ध असेल.अशी माहिती देण्यात आली आहे.
====

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *