धुळ्यात 150 महाविद्यालयीन युवक, युवतींची ‘महसूल दूत’ म्हणून नियुक्ती

विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे जिल्हा

नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या संकल्पनेतून महसूल सप्ताह 2025 अंतर्गत धुळे तालुक्यात ‘महसूल दूत’ उपक्रम राबविण्यात येत असून सुमारे 150 महाविद्यालयीन युवक-युवतींची महसूल दूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ओळखपत्रांचे वितरण आणि विशेष प्रशिक्षण आज देण्यात आले.

या उपक्रमासाठी धुळे तालुक्यातील 60 हून अधिक शाळा आणि महाविद्यालयांतून मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे 150 युवक युवतींनी स्वयंप्रेरणेने महसल दूत म्हणून सहभाग नोंदविलेला आहे. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन देखील या प्रशिक्षणात करण्यात आले.

धुळे तहसील कार्यालय, ग्रामीण येथे आयोजित प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय पवार, महसूल नायब तहसीलदार देवेंद्र येवले तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी श्री. कुवर यांनी महसूल विभागाच्या कामकाजात तरुणांचा सहभाग वाढावा, यासाठी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल दूत यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगिले. महसूल दूत हे डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीव्दारे पीक पाहणी नोंदविणे, ई-हक्क प्रणालीचा 11 प्रकारच्या फेरफार नोंदी 7/12 वर घेण्यासाठी वापर करणे, महसूल विभागामार्फत शैक्षणिक व नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्र / दाखले यांचेसाठी लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया यांची माहिती देणे आणि महसूल विभाग राबवित असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे यासाठी महाविद्यालयीन युवक-युवतींची नेमणूक करण्यात आली आहे.

मंडळ अधिकारी स्वप्निल शिंदे, ग्राम महसूल अधिकारी राकेश भोई यांनी महसूल दूतांना शासन योजनांची माहिती दिली, तर तलाठी राकेश भोई यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. शिबिरास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *