धुळे जिल्हा
धुळे शहरात काल कानुबाई मातेच्या विसर्जनादरम्यान एक वृद्ध इसम पांझरा नदीत वाहून गेला होता. या इसमाचा मृतदेह शोधण्याची मोहिम काल सायंकाळपासून राबविली जात होती. अखेरीस आज सकाळी हा मृतदेह शोधून काढण्यात एसडीआरएफला यश आले.
राजेंद्र नेरकर असे मयत इसमाचे नाव असून पंचवटी परिसरातील नदी पात्रातून ते बेपत्ता झाले होते. दुपारी घडलेल्या या घटनेनंतर वेगवेगळ्या पथकासह या भागात राहणार्या काही तरुणांनी दोराच्या सहाय्याने नदी पात्रात उतरुन शोध घेतला. पण नेरकर हे काही आढळून आले नाही. रात्री पावणे आठ वाजेपर्यंत शोध कार्य राबविण्यात आले. पण, नेरकर यांचा मृतदेह हाती लागला नव्हता. पांझरा नदी पात्रात आज सकाळी ६ वाजेपासून एसडीआरएफच्या पथकाकडून शोध कार्य सुरु करण्यात आले. त्यात देवपूर पोलीस ठाण्याच्या समोर एका कपारीत राजेंद्र नेरकर यांचा मृतदेह एसडीआरएफ पथकास मिळून आला.
या मोहिमेत एसडीआरएफचे पीएसआय सुरेश बगाड, पीएसआय राहूल अवचार, हवालदार स्वप्नील पाटील, विकास सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गिरासे, सोमनाथ जाधव, पोना मनोज चव्हाण, पोलीस आशिष तायडे, सचिन चव्हाण, दिनेश महाजन, शरद शेताडे, दिगंबर कुमावत, मोतीलाल पाटील, अन्सार सय्यद, रामकृष्ण सानफ, राधेश्याम केसरोद, योगेश सूर्यवंशी, गोविंद सोनवणे, अमोल टोणपे, वैभव कातबने यांच्यासह फायर ब्रिगेडचे कर्मचारी सहभागी झाले होते.