धुळे जिल्हा
भारताने पाकिस्तानवर केलेल्या सिंदूर ऑपरेशन विषयी लोकसभेत चर्चेवेळी कॉंगे्रसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलतांना, ऑपरेशन सिंदूर हा सरकारने मिडीया मध्ये उभा केलेला तमाशा होता, अशा आशयाचे वादग्रस्त विधान केले. याचा निषेध करीत आज धुळ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
धुळे शहरातील जमनालाल बजाज रोड येथील शहर पोलिस चौकी जवळ भारतीय जनता पार्टी, धुळे महानगर जिल्ह्याच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले. संसद सदस्य प्रणिती शिंदे यांनी भारतीय सेनेने यशस्वी पणे पार पाडलेल्या ऑपरेशन सिंदुर या अभुतपुर्व कारवाई बद्दल अपशब्द वापरुन भारतीय सेनेचा अवमान करून, मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे व देशाच्या स्वाभिमानाला तडा पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. हे वक्तव्य केवळ लज्जास्पदच नव्हे, तर अशा मानसिकतेचे लोक संसदेत आहेत, हीच शरमेची बाब आहे. अशी टीका यावेळी भाजपच्या नेत्यांनी केली.
शुरवीर जवानांच्या या यशस्वी ऑपरेशनवर राजकारण करणार्या कॉंग्रेस पक्षाचा आणि प्रणिती शिंदे यांचा निषेध नोंदविण्यात आला. ‘प्रणिती शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद,’ ‘ऑपरेशन सिंधुर वर टिका करणार्या प्रणिती शिंदेचा धिक्कार असो, धिक्कार असो’ अशा घोषणा दिल्या.
या आंदोलनात या आंदोलनात भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, माजी महापौर जयश्री अहिरराव, सौ.अल्पा अग्रवाल, आरती पवार, मोहिनी धात्रक, हिरामण गवळी, पृथ्वीराज पाटील, राजेंद्र खंडेलवाल, अमोल मासुळे, शशी मोगलाईकर, मनोज पिसे, जयवंत वानखेडकर, भिलेश खेडकर, प्रशांत बागुल,अनिल थोरात, ऍड. किशोर जाधव आदी सहभागी झाले.
कॉग्रेस खा. प्रणिती शिंदे यांचा भाजप पश्चिम मंडलच्या वतीने ही करण्यात आला तीव्र निषेध !
भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आमदार अनुपजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात भाजपा पश्चिम मंडल यांच्या वतीने सुद्धा कॉग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. चितोड रोड वरील क्रांती चौकात मंडल अध्यक्ष अमोल मासुळे यांच्या कार्यालया समोर हे आंदोलन झाले. यावेळी अमोल मासुळे यांच्यासह सुनील बैसाने, शशीशेखर मोगलाईकर, सौ.सुरेखाताई ओगले, प्रशांत बागुल, यशवंतजी येवलेकर, अजय अग्रवाल, दीपक खताळ, संदीप बैसाने, किशोर सरगर, अशोक जाधव, किशन जाधव, दिग्विजय गाळणकर, मनोज पिसे, चेतन माळी, दीपक कोळी, प्रीतेश अग्रवाल, गिरीश महाले, निलेश सैंदाने, सौ.उमाताई कोळवले, सागर सूर्यवंशी, अनिल थोरात, हर्षल देसाई, संजय महाजन, दिलीप जगताप, चेतन पाटील, मुकेश थोरात चंद्रकांत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, मोरे दादा, लक्ष्मण मराठे हे उपस्थित होते.