धुळे जिल्हा
धुळे तालुक्यातील कुलथे, मांडळ, पुरमेपाडा व सय्यदनगर या लघु प्रकल्प व कालव्यांच्या दुरुस्ती कामांसाठी सहा कोटी ६४ लाख कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचा दावा आ.राघवेंद्र (राम) भदाणे यांनी केला आहे.
आ.राघवेंद्र भदाणे यांच्या प्रयत्नातून लघु प्रकल्प व कालवा दुरुस्ती कामांसाठी सहा कोटी ६४ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामांच्या अनुषंगाने आता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
धुळे तालुक्यातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आ.भदाणे यांच्यातर्फे विशेष प्राधान्य देण्यात येते आहे. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आ.भदाणे यांनी पाणी प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधले होते.यावेळी आ.भदाणे यांच्या सूचनेवरून मोठ्या धरणातून लघु प्रकल्प व कालव्याच्या माध्यमातून पाझर तलाव भरले जात आहेत. काही ठिकाणी लघु प्रकल्प आणि कालवा नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते.
पाण्याची मोठ्याप्रमाणात नासाडी होते. यामुळे लघु प्रकल्प व कालवा दुरुस्तीसाठी पाठपुरावा करावा लागला. यानंतर धुळे तालुक्यातील लघु प्रकल्प कुलथे, लघु प्रकल्प मांडळ,सय्यदनगर कालवा व पुरमेपाडा प्रकल्पाच्या कालव्यावरील दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
धुळे तालुक्यातील लघु प्रकल्प कुलथे व लघु प्रकल्प पुरमेपाडा, सय्यद नगर कालवा दुरुस्ती कामास तांत्रिक मान्यता मिळालेली असून सप्टेंबर महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.लघु प्रकल्प व कालवा दुरुस्तीला शासकीय मान्यता मिळाल्या नंतर आमदार राम भदाणे यांचे कुलथे,मांडळ,पूरमेपाडा, सय्यद नगर येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
या कामांमुळे नियोजित पाण्याचे नुकसान होणार नाही. परीसरातील विहिरी व बोरवेल अशा जल स्रोतांमधून पाणी उपलब्ध होईल आणि परिसराला फायदा होणार आहे.पांझरा नदीवरील अनेक ठिकाणी असलेले लहान-मोठे शिवकालीन बंधारे नादुरुस्थवस्थेत असून आता यांचाही कायापालट होणार आहे.
पांझरेवरील फड पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामाचेही अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी मंडळ कार्यालयात सादर करण्यात आले आहेत. तालुक्यातील वार गाव पांझरा नदी किनारी असले,तरी या गावाला केवळ पाणी पूरविण्याच्या व्यवस्थापना अभावी पाण्याच्या कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे सर्वप्रथम येथील फड पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले.साधारणपणे १० ऑगस्ट पर्यंत मंडळ कार्यालयात याची प्रक्रिया सरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे.
—
लघु प्रकल्प आणि त्यांच्या दुरुस्ती देखभालीसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली रक्कम अशी :-
कुलथे-एक कोटी ३६ लाख, मांडळ -४७ लाख, पुरमेपाडा-एक कोटी ६७ लाख, सय्यदनगर कालवा-तीन कोटी १४ लाख अशी एकूण सहा कोटी ६४ लाख रुपये.