नवीन कराची आकारणी या वर्षापासून करू नये – नितीन बंग
धुळे जिल्हा
धुळ्याच्या शेजारी असलेल्या जळगाव, मालेगाव सारख्या महापालिकांकडून मालमत्ता कराचे दर कमी असून धुळे महापालिकेकडून भरमसाठ मालमत्ता कर आकारला जात आहे. याबाबत आज धुळे शहरातील व्यापारी महासंघाने महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांची भेट घेत मालमत्ता मुल्याकंनावर प्रश्न उपस्थितीत करीत दरवाढ कमी करण्याची मागणी केली.
कर योग्य मुल्यात मागील मुल्यापेक्षा १० % पेक्षा जास्त वाढ करू नये, मालमत्ता कराचा एकत्रित दर २५% पर्यंत करण्यात यावा, १ ऑगस्ट २०२५ पासून नवीन आकारणीचे बील व्हॉट्सऍपवर पाठवावे, १ ऑगस्ट २०२५ ते १५ सप्टेंबर दरम्यान १० % कराची सुट सुरू ठेवावी. पुढील टप्पे ८ % व ६% नियमानुसार करावे. मागील वर्षी असलेले करच आकारले जावे; नवीन कराची आकारणी या वर्षापासून होवू नये. तसेच संडास, बाथरुम, ओपनस्पेस, जीना पॅसेजला ५०% ऐवजी १०० % सूट देण्यात यावी. अशा विविध मागण्या यावेळी निवेदन देत महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या.
व्यापारी महासंघाचे नितीन बंग आणि आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यासंबंधी योग्य ती कार्यवाही केली जाईल; असे आयुक्तांनी सांगितले. याप्रसंगी नितीन बंग यांचेसह तुळशीदास सिंधी, भीमजी पटेल, खिमजी पटेल, अभिजीत सूर्यवंशी, अजित राठोड, प्रशांत देवरे आदी उपस्थित होते.