छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकाजवळ भव्य शंभुसृष्टीचेही निर्माण करावे – नानासाहेब कदम, अर्जुन आण्णा पाटील
आ.अनुपभैय्या अग्रवाल यांना स्मारक समितीचा वतीने निवेदन
धुळे शहर
धुळे शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचे ३० फुट उंचीचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले, त्याप्रमाणे संभाजी गार्डनच्या साडे चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून तर बलिदाना पर्यंत संपूर्ण इतिहासातील प्रमुख ऐतिहासिक दृष्याचा जिवंत देखावा असलेली भव्य शंभुसृष्टीचेही निर्माण करावी असे छत्रपती संभाजी राजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, अर्जुन पाटील यांनी शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना निवेदन दिले.
धुळे शहरातील पांझरा नदी किनारी भव्य असे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यात आले आहे. या कार्यात आमदार अनुप अग्रवाल यांनी भरघोस अशी मदत आणि सक्रीय सहभाग घेतला. याबद्दल आमदार अग्रवाल यांचे आभार व्यक्त करीत छत्रपती संभाजी राजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती, धुळे च्या वतीने शंभु तीर्थच्या शेजारी असलेल्या उद्यानाच्या जागेवर शंभुसृष्टी निर्माण करण्याची मागणी केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, छत्रपती संभाजी राजे पुर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या माध्यमातून नदी किनारी छत्रपती संभाजी गार्डन येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे ३० फुट उंचीचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. त्यात आपला सिंहाचा वाटा आहे. स्वराज्याच्या धाकल्या धन्याचे हे स्मारक उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच स्मारक ठरले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान तसेच त्यांच्या अद्वितीय पराक्रम युवकांना प्रेरणा देणारा व आदर्श निर्माण करणारा आहे.
असा राजा भूतो न भविष्यात घडेल असे वाटत नाही. तरी नदी किनारी संभाजी गार्डन येथे असलेले साडे चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मापासून तर बलिदाना पर्यंत संपूर्ण इतिहासातील प्रमुख ऐतिहासिक दृष्याचा जिवंत देखावा गार्डन मध्ये दर्शविण्याचा आमचा मानस आहे. देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था. धर्मासाठी मोघलां बरोबर मामांसह स्वकीयांशी छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेला संघर्ष आणि त्यांचे प्रखर हिंदुत्ववादी जिवन चरित्र प्रेरणादायी असुन आजच्या युवकांसमोर येणे काळाची गरज आहे.
भैय्यासाहेब आपण आम्हांस शंभू स्मारक निर्माणास तन मन धनाने मदत केलेली आहे. आपली ही प्रतिमा हिंदुत्व वादयांसाठी धर्मयौध्दा असून धर्माच्या कार्यास सर्वतोपरी मदत करीत असतात हीच मानसिकाता कायम ठेवून, आपण धुळे शहरात शंभुसृष्टी निर्माण करुन येणा-या पिढीला अभिमान व प्रेरणादायी शंभु महाराजांचा इतिहास शंभू सृष्टी च्या रुपाने निर्माण करुन एक इतिहास निर्माण करावा. ही नम्र विनंती. स्मारक निर्माण वेळी भा.ज.प.चे जिल्हाध्यक्ष असतांना आपले प्रमुख योगदान होते आता आपल्या आमदारकीच्या वचननाम्यानुसार शंभुसृष्टीच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.