धुळे जिल्हा
धर्मवीर राजे संभाजी महाराज यांना बलिदान दिना निमीत्त भारतीय जनता पार्टी धुळे महानगराच्या वतीने शंभुतीर्थावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी धुळे महानगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, धुळे शहर विधानसभेचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापुरकर व हिरामण आप्पा गवळी आदी मान्यवरांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,की धर्मवीर संभाजी महाराज यांचा औरंग्याने चाळीस दिवस आतोनात छळ करून, फाल्गुन कृष्ण पक्षपंचमी शके १६१० रोजी निघृण हत्या केली.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी व धर्मासाठी आपल्या स्व:प्राणाचे बलिदान दिले.म्हणून तमाम हिंदूजन आजचा काळा दिवस बलिदान दिन म्हणून पाळतात त्या अनुषंगाने आज २९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजेला धुळे येथील शंभुतीर्थावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला भारतीय जनता पार्टी, धुळे महानगराच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी नंदु ठोंबरे, भाजपा उपाध्यक्ष श्री. संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, माजी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई अहिरराव, नागसेन बोरसे, यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, निशाताई चौबे, मोहिणी धात्रक, पवन जाजू, प्रकाश उबाळे, किशोर जाधव, भगवान चौधरी, शरद चौधरी, बबन चौधरी, अनिल थोरात, तुषार भागवत, दिलीप शितोळे, शिवाजीराव चौधरी, सुहास अंपळकर, जयंत वानखेडकर, अरूण पवार, पंकज धात्रक, विनोद खेमणार, सचिन पाटील, शेखर कुलकर्णी, पंकज विंचु, चंद्रकांत महाजन, प्रितेश अग्रवाल, प्रकाश पोळ, सुनिल कोठावदे, विक्की सोनार, दिनेश शर्मा, मयुर सुर्यवंशी, महेंद्र शेणगे, जिवन आबा शेंडगे, इत्यादी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी, व लोकप्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.