मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ वाढदिवसानिमित्त मिलपरिसरात भव्य रक्तदान शिबीर संपन्न
आ.अनुपभैय्या, जिल्हाध्यक्ष अंपळकरांच्या नेतृत्वात भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष बंटी मासुळेंच्या पुढाकाराने क्रांती चौकात रक्तदान
धुळे शहर
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला. धुळे शहराचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनात भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमोल उर्फ बंटी मासुळे यांच्या पुढाकाराने चितोड रोड, क्रांती चौकात भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीराला भरघोस असा प्रतिसाद मिळाला, मिलपरिसरातील तरुणांसह, महिला पुरुषांनी रक्तदान केले. १४० बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदानाचा उपक्रम भाजपा प्रदेशअध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, धर्मयोद्धा कार्यसम्राट आमदार अनुपजी भैय्या अग्रवाल, मा.केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाषजी भामरे, मा.आमदार राजवर्धनजी कदमबांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर यांच्या मार्गदर्शनात व सूचनेनुसार राबवला गेला.
मिलपरिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटोळे व मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. २२ जुलै रोजी धुळे शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालय, क्रांती चौक,चितोड रोड, मिलपरिसर या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी ४.०० या वेळेतपर्यंत हे शिबीर सुरू होते. या वेळी रक्तदात्यांनी स्वयंपूर्तीने उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या संख्येने रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास भाजपा पक्षातर्फे २० लिटर पाण्याचा उत्तम क्वालिटीचा एक जार, प्रमाणपत्र भेटवस्तू म्हणून देण्यात आली.

या प्रसंगी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, सौ.अल्पाताई अग्रवाल, डॉ.सुशील महाजन, अशोक पाटोळे,माजी सभापती संजय जाधव, सुनील बैसाने, माजी नगरसेवक संतोष खताळ, शशीशेखर मोगलाईकर, जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, राजेंद्र पाचपुते,यशवंत हरणे,गौतम भैय्या गायकवाड, बंडूनाना पवार,सुनील पाटील,किशोर सरगर,नानासाहेब जोशी,विनायक चव्हाण,पै.जालिंदर जाधव,युवराज माने,सुनील तात्या देवरे,सुनील चौधरी,भिलेश खेडकर,शांताराम नेरकर, डॉ.श्रीमती.लिलावती राजवाडे मावशी,अशोक बाविस्कर,महेश थोरात,मधुकर पाटील, निलेश नेमाने,मोरे दादा,तुषार नवले, डॉ.केतन राजवाडे, डॉ.संजय खोपडे,अर्जुन गवळी,अनिल धनगर,पुराणिक सर,रमेश नवाल,धर्मराज बारी,शांताराम पाटील,अशोक फेटे,शंकर सूर्यवंशी,देवरे टेलर,ताराचंद पाटील,मनोहर जोशी,काशिनाथ पाटील, कापूरे सर,युवराज माने,दिनेश गायकवाड, मंगा बागले,शरद मोरे,धर्मराज सोनवणे,सोनू बापू देसले,संजय हटकर, रतीलाल बाबा वाघ,कैलास पवार,नंदकिशोर वानखेडे,भंडारी बाबा, देवीदास शिंदे,सुरेश सूर्यवंशी,सुरेश कंधारे,सुनील घटी,पप्पू कांबळे,मंत्री निस्ताने,महेंद्र रावते, सतिष पाटील,युवराज सूर्यवंशी,विकास देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीकांत पाटील, वाल्मीक जाधव,गोविंदा सोनवणे,लक्ष्मण मराठे,वासुदेव पाटील,चंद्रकांत भामरे,मुकेश थोरात,चंद्रकांत पाटील,राजेंद्र सुपनर,अशोक जाधव, किशन जाधव,सौ.सुनीताताई सोनार,मनोज पिसे, दिग्विजय गाळणकर,हर्षल खताळ,चंद्रकांत रगडे,मुन्ना मराठे,प्रशांत सूर्यवंशी,भटू गवळी,वनराज पाटील,पवन अहिरे,सुनील पाटील,नितीन आखाडे, घमू पाटील,बाळा पाटील, व्यंकटेश निंबाळकर,निखिल मराठे,आकाश थोरात,दादा गलांडे,किरण डोमाळे,विक्की वाघमोडे,सचिन बाबाजी पाटील,नारायण पाटील,मुन्ना पाटील,विक्की थोरात,किरण हाके,दर्शन सोनार,विक्की मेकले, दीपक बागुल,गणेश बडगुजर,गौरव गांगुर्डे,ऋतिक वाघ,भाऊसाहेब पाटील,गोपाल पाटील,सदानंद लगड आदींनी परिश्रम घेतले. यावेळी धुळे शहर विधानसभा भाजपा पश्चिम मंडल मधील सन्माननीय बूथ प्रमुख, विविध पदाधिकारी, कार्यकर्त, माता-भगिनी, युवक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदात्यांचे आभार व नागरीकांना आवाहन
मंडल अध्यक्ष बंटी मासुळे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दिवसभर संकलीत करण्यात आलेले रक्त सुरक्षीतपणे रक्त पेढीमध्ये रवाना करण्यात आले. मिलपरिसरातील जनतेने दिलेल्या भरघोस अशा प्रतिसादाबद्दल बंटी मासुळे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच मिलपरिसरातील कोणालाही रक्ताची गरज भासल्यास त्याने २४ तासात केव्हाही संपर्क साधावा त्यास रक्त उपलब्ध करुन दिले जाईल. असे आवाहन देखील बंटी मासुळे यांनी केले आहे.

श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान रक्तदानात अग्रेसर
माजी नगरसेवक तथा भाजपा मंडल अध्यक्ष बंटी मासुळे आणि त्यांचे सहकारी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परम गौभक्त रविंद्रबापुजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ ते १० वर्षापासून मिलपरिसरात दरवर्षी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवत असतात. आणि त्या माध्यमातून आता पर्यंत हजारो गरजूंना रक्तदान या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यंदा भाजपाच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ घेण्यात आला. त्यातही श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांनी उत्साहाने सहभागी होत. शेकडोच्या संख्येत रक्तदान केले.