धुळे शहर
धुळे शहरातील वाडीभाेकर राेडवरील श्रीराम नगरात देवपूरातील सर्वांत उंच दाक्षिणात्य शैलीतील ६१ फुट उंचीचे प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिराचा जिर्णाेध्दार करण्यात आला आहे. त्याठिकाणी २७ ते ३० जुलै या काळात प्राणप्रतिष्ठा साेहळा आयाेजित करण्यता आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहेत. अशी माहिती श्रीराम सर्वांगिण विकास संस्थेतर्फे देण्यात आली आहे.
या मंदिराचा जिर्णाेध्दार करण्यात आला आहे. याठिकाणी दाक्षिणात्य शैलीतील ६१फुट उंचीचे असे देवपूरातील सर्वांत माेठे मंदिर उभारण्यात आले आहे. यामंदिरात २७ जुलैपासून प्रभु श्रीराम जिर्णाेध्दार व प्राणप्रतिष्ठा साेहळा हाेणार आहे. त्यात रविवारी (दि.२७) राेजी दुपारी ३ वाजता श्री प्रभू रामचंद, श्री. लक्ष्मण, श्री.सितामाता, श्री,.हनुमान यांच्या मुर्तीची शाेभायात्रा व प्रदक्षिणा,स्वागत, पूजन, आरती व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम हाेणार आहे.साेमवारी (दि.२८) राेजी सकाळी ८ वाजेपासून शांतीपाठ पठण, गणपती पूजन, आयुष मंत्रजप, देवता स्थापना, ग्रहयज्ञ हाेम, सायंपूजन, प्रसाद वाटप, मंगळवारी (दि.२९) राेजी सकाळी ८ वाजता प्रात:पूजन,प्रसाद, वास्तुशांती, पराय हवन, प्रधान हवन, सायंपूजन आरती, प्रसाद वाटप तर बुधवारी (दि.३०) राेजी सकाळी ७ पासून शांतीयुक्त पठण, प्रात:पूजन, भुपाळी, मुर्तीस्नान, हाेमहवन, श्री प्रभू रामचंद्र परिवार स्थापना प्राणप्रतिष्ठा,पुर्णाहुर्ती महाआरती हाेईल.तर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.प्राणप्रतिष्ठा साेहळा आयचित गुरूजी यांच्या उपस्थितीत हर्षल जाेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हाेणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सर्वांगिण विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी, भक्तगणण यांच्याकडून करण्यात आले आहे.
लाेकसहभागातून सहा महिन्यात उभारणी…
देवपूरातील सर्वांत उंच ६१ फुट उंचीच्या दक्षिणात्य मंदिराची उभारणी लाेकसहभागातून केवळ सहा महिन्यात करण्यात आली आहे. त्यासाठी काेणत्याही राजकीय नेत्याकडून निधी घेण्यात अाला नाही. काॅलनी परिसरातील नागरीकांकडून निधी घेऊन मंदिर बांधण्यता आले.
२५ वर्षापासून नित्यनियमाने पूजाआरती…
वाडीभाेकर राेडवरील जयहिंद सिनिअर काॅलेजशेजारी असलेल्या श्रीराम नगरात १९९९-२००० मध्ये छाेटेखानी श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात हाेती. या मंदिराची पायाभरणी डाॅ.पी.टी.जाेशी, स्व.चंद्रकांत केले, स्व.सदूकाका जाेशी यांच्या पुढाकारातून केली गेली हाेती.