जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा

नवी दिल्ली

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या एका पत्रात आरोग्यासंबंधी कारणे आणि उपचार घेण्याचा सल्ला याचा हवाला देत, संविधानाच्या कलम ६७ (अ) अंतर्गत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. दरम्यान धनखड यांनी या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचेही सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहेत.

राष्ट्रपतींना लिहिलेल्या त्यांच्या पत्रात जगदीप धनखड यांनी आरोग्याला प्राथमिकता देत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे असे म्हटले आहे.

मार्च महिन्यात जगदीप धनखड यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबंधीत इन्फेक्शन झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांची रुग्णालया जाऊन भेट घेतली होती. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच धनखड यांनी राजीनामा दिला आहे. आजच अधिवेशनाचा पहिला दिवस होता.

२०१४ मध्ये धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. ६ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपती पदाची निवड झाली होती. यावेळी विरोधी पक्षाचा उमेदवार मार्गरेट अल्वा या होत्या, ज्यांना धनखड यांनी पराभूत केले. धनखड यांना ७२५ पैकी ५२८ मते मिळाली होती. तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला १८२ मते मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *