धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल पहाटे चार वाजेपासून पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही गुन्हे प्रतिबंधक योजना प्रभाविपणे राबवून तीन बंदूक,चार तलवार अशी प्राणघातक शस्र जप्त केली. तसेच अनेक ठिकाणी तपासणी मोहीम राबवली.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज सकाळी माहिती दिली.ते म्हणाले, काल पहाटे साधारणपणे चार वाजेपासून ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही योजनाराबविण्यात आली.रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत तीन बंदूक, चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हातभट्टी दारूचे वेगवेगळ्या ६३ ठिकाणी असलेली ठिकाणे उद्वस्त करू संशयितांना अटक करण्यात आली आहे. या शिवाय जुगार मटका चालणाऱ्या ४० ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.एका संशयितास तडीपार करण्यात आले.
पोलिसांनी या मोहीमेत वेगवेगळ्या ३०० वाहनांचीही तपासणी केली.७ मद्यपिंवर तसेच अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली ७ संशयितांवर कारवाई करण्यात आली.२९ जणांना वॉरंट बजावण्यात आले असून २१ सराईत गुन्हेगारांची हिस्ट्रीशीटर तपासणी करण्यात आली.
याशिवाय १०२ लॉज व ढाबे तपासण्यात आले आले.यासाठी जवळपास २४ ठिकाणी नाका बंदी करण्यात आली होती.पोलिस हे कायद्याच्या चौकटीत राहून अतिशय मेहनतीने आपले कर्तव्य आणि शहरात शांतता राहील या कडे जबाबदारी ने आपले कार्य करीत आहेत.