सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे धुळे जिल्हा शिबिर संपन्न, नवनियुक्त जिल्हास्तरीय कार्यकारिणीची घोषणा

 

धुळे जिल्हा

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे एकदिवशीय जिल्हा शिबिर देवपूरातील संत रविदास भवन येथे संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु. तायडे यांनी केले. यावेळी मंचावर संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल, सचिव तुषार सूर्यवंशी, कॉ. एल.आर.राव, कॉ.दत्ता थोरात, ज्वाला मोरे, सिद्धार्थ जगदेव उपस्थित होते.

उद्घाटकीय भाषणात ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते एस. यु.तायडे यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत सरकार नवीन शैक्षणिक धोरण लादून दलित कष्टकरी वर्गाला शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याचे कारस्थान करीत आहे. म्हणून विद्यार्थी वर्गाने सम्यक ज्ञान आत्मसात करून सर्वंकष शोषणाच्या विरोधातील आवाज बुलंद करावा असं आवाहन केलं.

दुसऱ्या सत्रात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सचिव तुषार सुर्यवंशी यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची भूमिका विषद केली तर विजय वाघ यांनी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे लढे यावर प्रकाश टाकला. यावेळी माजी राज्य सचिव राकेश अहिरे आणि प्रा.सतिष निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. भोजन अवकाशानंतर शंकर यशोद दिग्दर्शित “अ” ही शॉर्ट फिल्म दाखवून चर्चा करण्यात आली. समारोप सत्र सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सिद्धांत बागुल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या सत्रात सिद्धार्थ जगदेव यांनी विद्यार्थी संघटना आणि मैत्रीभाव या विषयावर विचार मांडले. यावेळी प्रा.तथागत सुरवाडे उपस्थित होते.

बैठकीत संघटनेची नूतन जिल्हास्तरीय कार्यकारिणी घोषित करून नवनियुक्त पदाधिकारी आणि सभासदांचा पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला. यात जिल्हाध्यक्ष केतन निकम, सचिव हर्ष मोरे, उपाध्यक्ष धम्मदीप मोरे, संघटक धनंजय जगताप, संघटक -निलिमा भामरे, सदस्य राज पगारे, विलास जाधव, मयुरी जाधव, सिद्धार्थ बैसाने, श्वेता गवळे, तेजस्वी पिवाळ, धनराज झाल्टे, हरिष वाघ, विश्वजित वाघ, सिद्धार्थ बागुल आदींची जिल्हास्तरीय कार्यकारिणीवर निवड करण्यात आली. त्यांचे सर्वानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सिद्धांत बागुल, हर्ष मोरे, विजय वाघ, केतन निकम, निलिमा भामरे, भूषण ब्राह्मणे, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाने, रोहिणी जगदेव, शरद वेंदे, सचिन बागुल यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *