धुळे जिल्हा
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेच्या धुळे येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन अमृतचे राज्य व्यवस्थापक दिपक जोशी आणि विभागीय उपव्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांच्या हस्ते आज झाले.
या प्रसंगी अमृतचे जिल्हाव्यवस्थाक डॉ. हेमंत पाठक, राजेंद्र कानडे, प्रज्ञोत कुलकर्णी, योगेश अहिरे, विलास चंद्रात्रे, ओंकार जोशी, सुहास जोशी आदी उपस्थित होते.
राज्य व्यवस्थापक श्री. जोशी यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने धुळे जिल्ह्यातील अमृत संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच जिल्हा व्यवस्थापक डॉ.हेमंत पाठक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विभागीय उपव्यवस्थापक श्री. खाडिलकर यांनी धुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अमृतच्या माध्यमातून निश्चितच लाभ होईल असे सांगत, जिल्ह्यातील लक्षित गटातील नागरिकांनी अमृत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.