धुळे
Dhule gudhi padwa utsav गुढीपाडवा निमित्त आज हिंदू नववर्षाचे स्वागत करीत आज सकाळी धुळे शहरातून भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. या स्वागत यात्रेतील विविध धार्मिक सामाजिक आणि महापुरुषांचे सजीव देखावे सर्वांचेच लक्ष वेधणारे ठरले टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या या स्वागत यात्रेने तो वेळ धुळे शहर दुमदुमून गेले.
सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद तसेच विविध धार्मिक संघटना यांच्या वतीने काढण्यात आलेल्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा शुभारंभ आई एकविरा देवी मंदिर येथुन सकाळी 10 वाजेच्या सुमारास करण्यात आला.
याप्रसंगी खासदार डॉ शोभाताई बच्छाव, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, संतश्रेष्ठ एकनाथ महाराज, पैठण यांचे बारावे वंशज हभप योगेश महाराज गोसावी, प्रमुखस्वामी महाराज आनंद जीवनदासजी स्वामी, प्रमुख कोठारी महंत स्वामी नारायण मंदिर यांची विशेष उपस्थिती होती.
शोभायात्रेत ढोल-ताशे, जिवंत देखावे, संविधान प्रत, अहिल्याबाई होळकर यांचा सजीव देखावा, वारकरी संप्रदाय ब्रह्मवृंद श्रीराम परिवार हनुमान सेना भारत माता झाशीची राणी यासारखे विविध सजीव देखावे, शौर्य पथक, मल्लखांब, महिला शंखनाथ पथक, घोडेस्वार सह ग्रामदैवत एकवीरा देवीची पालखी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली.
तरुण-तरुणी पारंपारिक वेशभूषित या शोभा यात्रेत शेख पुढच्या संख्येने सहभागी झाले होते धुळे शहरातील नगरपट्टी जुने धुळे सहावी गल्ली पाच कंदील मार्गे फुलवाला चौकातील श्रीराम मंदिरावर शोभायात्रा पोहोचल्यावर महाआरती करून यात्रेचा समारोप करण्यात आला.
या यात्रेत ज्येष्ठ कार्यकर्ते हिरामण गवळी, युवराज करनकाळ, कैलास चौधरी, हिलाल माळी, योगीराज मराठे, विजय पाच्छापूरकर, मुन्ना अग्रवाल, माजी महापौर, प्रदीप कर्पे, उमेश चौधरी, भरत देवळे, निफाडकर गुरूजी,
सुभाष कांकरिया, नाना महाराज हलोर, लोकेश चौधरी, सचिन मराठे, मयुर सूर्यवंशी, महेंद्र विसपूते, राकेश संचेती, अमोल जाधव आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.