धुळे शहर
माजी सैनिक चंदू चव्हाण यांना अमानुषपणे मारहाण करणार्या धुळे महापालिकेतील हल्लेखोर कर्मचार्यांचे निलंबन करुन गुन्हे दाखल करावी, अशी मागणी करीत आज छावा मराठा संघटनेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख नानासाहेब कदम यांच्यासह सहकार्यांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना निवेदन दिले.
दि.०९/०७/२०२४ रोजी भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक चंदू चव्हाण रा. मोहाडी हे आपल्या घराजवळील समस्यांचे लोकशाही मागणी निवेदन देण्यासाठी गेले असतांना त्यांना धुळे म.न.पा.तील काही कर्मचारी यांनी शिवीगाळ करीत दमदाटी करीत मारहाण करुन अमानुषपणे गच्ची धरुन गुन्हेगाराप्रमाणे धुळे म.न.पा.च्या गेट पर्यंत ओढून घेऊन हाकलुन लावण्यात आले आहे व तो विडीयो संपूर्णपणे सोशल मिडीयावर देखील व्हायरल झाला आहे व घडलेला प्रकार हा निंदनीय असून धुळे शहराला तसेच लोकशाही मार्गाला देखील घातक आहे. चंदू चव्हाण याने यापुर्वी त्याच समस्यांचे या आधी देखील लोकशाही मार्गाने निवेदन देऊन आपली व्यथा मांडली होती. परंतु त्यांचे समस्यांचे निराकरण झाले नसल्याने त्यांचा नाईलाजाने पी. व्ही.सी. करीत मागणी ठेवली असेल त्याचा राग येउन. संबंधीत कर्मचारी यांनी कायदा हातात घेउन कुव्यवस्था करण्याचा कळस गाठला आहे. ह्या कर्मचारी यांना मारहाणीचे एवढे अधिकार दिले कोणी? हाच प्रश्न संपूर्ण धुळे शहराला पडलेला असावा. इंग्रजांनाही लाजवेल असे कृत्यू धुळे म.न.पा. कर्मचारी यांनी करुन दाखवले आहे. मॅडम साहेब असेच जर चालु राहिले तर लोकशाही पायदळी तुडवण्याचे प्रकार रोजच घडतच राहतील व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकलो. तरी हल्लेखाराविरोधात गुन्हे दाखल करुन तातडीने निलंबन करावे, अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
याप्रंसगी छावाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब कदम, अर्जुन आण्णा पाटील, ऍड. दिनेश काळे, ऍड. नितीन पाटील, दिलीप पाटील, कोमलभाऊ आभाळे, बापूभाऊ देवरे, हेमंतभाऊ भडक, नीतीन भाऊ जाधव, नंदू अहिराव,महेश पाटील,दिनकर जाधव आदी उपस्थित होते.