साक्री नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांच्या विरुध्द नगरसेविकांचे अन्नत्याग आंदोलन

 

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीत मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी हे विकासकामांच्या निविदा उघडत नसल्याचा आरोप करुन भाजपा नगरसेविकांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले.

माजी नगराध्यक्षा जयश्री पवार आणि नगरसेविका मनीषा देसले यांनी अन्नत्याग केले आहे. साक्री शहरातील विकास कामांच्या निविदा मागील तीन महिन्यांपासून खुल्या झालेल्या नाहीत. मुख्याधिकारी परदेशी हे मनमानी पद्धतीने कारभार चालवतात. तसेच शासकीय अधिकारी असून ते राजकीय अविर्भावात वावरतात. सत्ताधारी भाजपाला बदनाम करण्यासाठीच ते विरोधकांशी षड्यंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नगरसेविकांनी केला आहे. या विरोधात नगरसेविकांनी आज पासून अन्न त्याग आंदोलन सुरु केले. त्यांच्या या आंदोलनात बांधकाम सभापती उज्वला भोसले, नगरसेविका जयश्री पगारिया, ऍड. पूनम काकुस्तेशिंदे, पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ यांच्यासह हेमंत पवार, विजय भोसले, विनोदकुमार पगारिया, महेंद्र देसले आदी सहभागी झाले.

अन्नत्याग करणार्‍या नगरसेविकांची साक्री ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी आरोग्य तपासणी केली. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *