४२ लाखांचा मुद्देमाल धुळे पोलिसांनी केला नागरिकांना परत

चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत हस्तगत केलेला ४२ लाखांचा मुद्देमाल धुळे पोलिसांनी केला नागरिकांना परत

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांचा यशस्वी तपास करीत पोलिसांकडे जप्त झालेल्या तब्बल ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रारदार नागरिकांना सुपूर्द करण्यात आला. यात सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि वाहनाचा समावेश आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून आज पोलीस मुख्यालयाच्या विविध उपयोगी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या तपास यंत्रणेने गुन्हे उघडकीस आणून संशयितांकडून किंमती मुद्देमाल जप्त केला.ज्यांच्या घरातून हा ऐवज चोरीस गेला त्या मालकांना बोलावू मुद्देमालसंदर्भात कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करुन मुळमालकाकडे हस्तांतर करण्यात आले.

यात सहा सोने-चांदीचे दागिने असून त्यांची किंमत २३ लाख ८४५ रुपये आहे. दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे दोन टँकर, ट्रॅक्टर व ट्रॉली,११ लाख ६१ हजार ७९० रुपये किमतीचे ९६ मोबाईल हँडसेट तसेच चार लाख ९० हजार रुपये किंमतीच्या १४ मोटरसायकल याचा समवेश आहे. या मुद्देमालची किंमत ४२ लाख दोन हजार ७३५ रुपये आहे.

यावेळी पोलीस उप अधीक्षक विश्वजित जाधव, राजकुमार उपासे, संजय बाबळे,प्रशिक्षनार्थी पोलीस उप अधीक्षक सागर देशमुख, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमास गुन्हयातील फिर्यादी महिला व पुरुष असदी उपस्थित होते.अनेकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना धुळे पोलीसांचे आणि न्याय व्यवस्थेचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *