धुळ्यात शिवसेना उबाठा, मनसेचे जोडे मारो आंदोलन

 

धुळे जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि भोसले घराण्याबद्दल अवमानकारक बोलणारे आमदार संजय गायकवाड आणि मराठी माणसाला आपटून मारण्याची धमकी देणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आज धुळ्यात आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उबाठा चंद्रशेखर आझाद नगर विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांकडून प्रकाश टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दोघी नेत्यांना निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र आणि मराठी माणूस हा संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,संत तुकाराम,श्री छत्रपती शिवाजी महाराज या संतांच्या, महात्म्यांच्या पुण्याईने आणि आशीर्वादाने हा महाराष्ट्र अत्यंत गुण्यागोविंदाने पुढे जात आहे परंतु सत्तेत बसलेले काही राजकीय पक्षाचे वादग्रस्त नेते हे गरळ ओकत असतात. तसेच बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी संपूर्ण भोसले परिवारावर अपमानास्पद वक्तव्य केले तसेच खासदार निशिकांत दुबे यांनीही महाराष्ट्रातील मराठी माणूस आमच्याकडे आला तर त्याला उपटून मारू अशा प्रकारची धमकी दिली, असा आरोप करीत त्याच निषेधार्थ धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत जोरदार निषेध आंदोलन करत दोघे नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *