धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यात विशेषतः साक्री तालुक्यातील माळमाथा भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे पांझरा मध्यम प्रकल्प आज 06 जुलै रोजी संध्याकाळी 8 वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून सद्यस्थितीत 617 क्युसेक्स ने विसर्ग चालू झाला आहे.
तसेच जामखेडी मध्यम प्रकल्प यापूर्वीच पूर क्षमतेने भरला असून सद्यस्थितीत सतत पावसामुळे 3354 क्युसेक्स इतका विसर्ग चालू आहे.
तरी पांझरा नदी काठच्या गावांना नदीपात्रात आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदीपात्रात जाऊ नये तसेच सावधगिरी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देण्यावा यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.